मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने निर्माण केला नवा रेकॉर्ड, एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार

सतत तिसऱ्या वर्षी रिलायन्सच्या नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये कंपनीने वेगवेगळ्या व्यवसायात २ लाख ३२ हजार नोकऱ्या दिल्या.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने निर्माण केला नवा रेकॉर्ड, एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 3:34 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नवा रेकॉर्ड निर्माण केला. गेल्या एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना रोजगार दिला. मुकेश अंबानी यांनी गेल्या तीन वर्षात एक रुपयासुद्धा सॅलरी घेतली नाही. २०२२-२३ मध्ये रिलायन्स गृपने २ लाख ६२ हजार लोकांना नोकरी दिली. यापैकी १ लाख ८० हजार रिटेलशी संबंधित आहेत. ७० हजार ५०० लोकं जियोशी संबंधित आहेत. असा रेकॉर्ड एका वर्षात दुसऱ्या कोणत्याही कंपनीने निर्माण केला नाही. रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, दोन लाख ४५ हजार ५८१ ऑन रोल कर्मचाऱ्यांसह रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठ्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आला आहे. रिलायन्सच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख ८९ हजार झाली आहे.

सतत तिसऱ्या वर्षी वाढल्या नोकऱ्या

सतत तिसऱ्या वर्षी रिलायन्सच्या नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये कंपनीने वेगवेगळ्या व्यवसायात २ लाख ३२ हजार नोकऱ्या दिल्या. यापूर्वी २०२०-२१ मध्ये कोरोना काळात कंपनीने ७५ हजार नोकऱ्या दिल्या.

तीन वर्षांत कंपनीने जमा केले इतके लाख कोटी

रिलायन्स इंडस्ट्री सर्वात जास्त टॅक्स देणारी कंपनी झाली आहे. मार्च २०२३ ला समाप्त झालेल्या वित्तीय वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने टॅक्सच्या रुपात १ कोटी ७७ लाख कोटी रुपये दिले. त्यापूर्वीच्या वर्षी २०२१-२२ मध्ये टॅक्सच्या रुपात १ कोटी ८८ लाख रुपये दिले. कंपनीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रुपात तीन वर्षांत सरकारी खजान्यात ५ कोटी ६५ लाख कोटी रुपये जमा केले.

रिलायन्स हे नाव येताच मुकेश अंबानी डोळ्यासमोर येतात. सुरुवातीला त्यांनी कमी पैशात जीओ देशात उपलब्ध करून दिला. त्यामुळे युवकांचा जीओकडे कल वाढला. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे रिलायन्सच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराने आता रेकॉर्ड मोडला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.