Mukesh Ambani | अनंत अंबानी, इशा अंबानी आणि आकाश अंबानी, तिघांचा पगार आहे तरी किती

Mukesh Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीचा डोलारा संभाळण्यासाठी तिसरी पिढी सज्ज झाली आहे. दोन पिढ्यांनी लहान रोपट्याचा वटवृक्ष केला. नवीन पिढीला त्याचा विस्तार करायचा आहे. रिलायन्सच्या तीन वारसदारांचा, अनंत अंबानी, इशा अंबानी आणि आकाश अंबानी यांचे वेतन किती आहे, माहिती आहे का?

Mukesh Ambani | अनंत अंबानी, इशा अंबानी आणि आकाश अंबानी, तिघांचा पगार आहे तरी किती
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे वेतन घेत नाहीत. 2020-2021 पासून त्यांनी हे धोरण स्वीकारले आहे. कोरोना काळात त्यांच्या या निर्णयाचे कौतुक झाले होते. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. पगार न घेण्याच्या निर्णयापूर्वी त्यांनी वार्षिक 15 कोटींपेक्षा अधिक वेतन न घेण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या या दोन्ही धोरणांचे उद्योग जगतातून स्वागत झाले. फोर्ब्सनुसार मुकेश अंबानी हे सध्या जगातील अब्जाधीशांच्या यादी 12 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 91.7 अब्ज डॉलर इतकी आहे. पण त्यांच्या तीन मुलांची कमाई किती आहे, त्यांना किती वेतन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

नीता अंबानी यांचे वेतन किती

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या संचालक मंडळातून बाहेर पडल्या आहेत. पण रिलायन्स फाऊंडेशनची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. 2021-22 मध्ये त्यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून बैठकीसाठी 6 लाख रुपये अदा करण्यात आले. तर 2022-23 मध्ये त्यांना 2 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती द टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या रिपोर्टमध्ये दिली.

हे सुद्धा वाचा

आकाश अंबानीची कमाई किती

आकाश अंबानी याच्याकडे टेलिकॉम सेक्टरची जबाबदारी आहे. जून 2022 पासून तो रिलायन्स टेलिकॉम युनिटचा अध्यक्ष आहे. सध्या जिओने आघाडी घेतली आहे. ऑपिटकल केबलच्या माध्यमातून लवकरच सर्वात वेगवान इंटरनेट देण्याची त्यांची योजना भारतभर मूर्त रुपात येणार आहे. त्यासाठी अब्जावधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. आकाश याला बैठकीचा खर्च आणि नफ्यातून कमिशन देण्यात येते. तर रिलायन्स बोर्ड पॅकेज त्यांच्या आई इतकेच आहे.

इशा अंबानीची मिळकत

इशा ही मुकेश अंबानी यांची लाडकी लेक आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचरचा अवघा पसारा तिच्या ताब्यात आहे. या रिटेल कंपनीतंर्गत जगातील अनेक ब्रँड एकवटले आहे. त्यात अनेक कंपन्यांची दरवर्षी भर पडतच आहे. ही कंपनी महसूलात आणि नफ्यात अग्रेसर आहे. मनी कंट्रोलच्या दाव्यानुसार, रिलायन्स रिटेलचा 8,361 कोटींच्या घरात डोलारा आहे. तिने आनंद पिरामल यांच्याशी लग्न केले आहे. आकाश प्रमाणेच ती पण वेतन घेत नाही. तिला रिलायन्स मंडळाच्या नियमानुसार मानधन आणि लाभांश मिळतो. तर शेअर, लाभांश, बोनस शेअर यामाध्यमातून मोठी कमाई होते.

अनंत अंबानीची किती कमाई

अनंत अंबानी हा सर्वात धाकटा मुलगा आहे. तो जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेलच्या संचालकांपैकी एक आहे. तर त्यांच्याकडे नव्याने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याने राधिका मर्चंटसोबत लग्न केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी RIL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑगस्ट महिन्यात तीनही मुलांना संचालक मंडळावर घेण्याचा निर्णय घेतला. आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळात आले. रिलायन्स व्यवस्थापकीय मंडळाच्या नियमानुसार अनंतला अनुषांगिक लाभ देण्यात येतात.

अंबानी कुटुंबियांकडे आहेत इतके शेअर

मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) आकडेवारीनुसार, अंबानी कुटुंबियांसह प्रमोटर्स यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.39 टक्के वाटा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर बाजारात एकूण 6,76,57,88,990 म्हणजे 6 अब्ज 76 कोटी 57 लाख 990 शेअर आहेत. त्यातील 50.39 टक्के वाटा बाजूला काढला तर अंबानी कुटुंबियासह प्रमोटर्सकडे एकूण 3,32,27,48,048 शेअर्स म्हणजे 3 अब्ज 32 कोटी 27 लाख 48 हजार 48 शेयर आहेत. त्यामाध्यमातून त्यांना मोठी कमाई होते.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.