आssssहाssहा! मुकेश अंबानीच्या मुलाने दुबईत खरेदी केलेली प्रॉपर्टी पाहून तुम्हीही हेच म्हणाल, किंमत फक्त 80 मिलियन डॉलर

Anant Ambani Dubai Home : अनंत अंबानी यांनी खरेदी केलेल्या या घराच्या जवळच शाहरुख खानने दुबईत खरेदी केलेला एक बंगलाही आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि अनंत अंबानी हे शेजारी-शेजारी असतील. शाहरुख खान, ब्रिटिश फुटबॉलर डेविड बेकहम यांनीही दुबईत घर खरेदी केलेली आहे.

आssssहाssहा! मुकेश अंबानीच्या मुलाने दुबईत खरेदी केलेली प्रॉपर्टी पाहून तुम्हीही हेच म्हणाल, किंमत फक्त 80 मिलियन डॉलर
अनंत अंबानीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 10:59 AM

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. श्रीमंत व्यक्तींची घरं, त्यांचं राहणीमान हे आलीशान आणि घरं सेव्हन स्टार सारखी असली तर आश्चर्य वाटायला नको. आता तर मुकेश अंबानी यांच्या सगळ्यात लहान मुलाने अनंत अंबानीने (Anant Ambani) दुबईत एक अत्यंत खास आणि सगळ्यात महागडं घर खरेदी (Anant Ambani Dubai Property) केलं. खरंतर हे घर नसून एक विलाच आहे. एखाद्या राजेशाही हवेलीसारखं वाटावं, अशा या घराची किंमत तब्बल 80 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार या घराची किंमत तब्बल 63 कोटी 96 लाख 74 हजार 400 इतकी जबरदस्त आहे. हे घर दुबईच्या उत्तरी भागात आहे. यात एकापेक्षा एक खास लक्झरी सुविझी असून, हे घरा एखाद्या सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. दुबईतील एका समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेल्या या घराची चर्चा सध्या तुफान रंगलीय.

दुबईच्या पाम जुमेराह या ठिकाणी ही प्रॉपर्टी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतने खरेदी केलाय. या वर्षाच्या सुरुवातील त्याने दुबईत इन्व्हेस्टमेन्ट केली. पण या प्रॉपर्टीचा व्यवहार हा गुप्त ठेवण्यात आला होता. इतकंच नाही तर अंबानी आता या हवेलीची दुरुस्त करण्यासाठी पुन्हा काही लाख डॉलर रुपये खर्च करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय.

हे घर समुद्रकिनारी आहे. लांबूनच हे घर आकर्षित करतं. प्रत्येक सुखसोयींची खास काळजी या घरात ठेवण्यात आलीय. एकूण 10 बेडरुम या घरामध्ये आहेत. त्यापैकी पाहुण्यांना राहण्यासाठीची वेगळी सोय करण्यात आलीय. घराच्या आत आणि बाहेर असे दोन स्विमिंग पूलदेखील आहे. शिवाय घराच्या अवतीभवतीही खेळण्यासाठी मोठी जागा आहे. विशेष म्हणजे एका खासगी जीमशिवाय एक प्रायव्हेट थिएटरही या घरात असल्याचं सांगितलं जातंय.

हे सुद्धा वाचा

किंगखान शेजारी

अनंत अंबानी यांनी खरेदी केलेल्या या घराच्या जवळच शाहरुख खानने दुबईत खरेदी केलेला एक बंगलाही आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि अनंत अंबानी हे शेजारी-शेजारी असतील. शाहरुख खान, ब्रिटिश फुटबॉलर डेविड बेकहम यांनीही दुबईत घर खरेदी केलेली आहे. दुनियाभरातील लोकांनी दुबईत येऊन रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवावेत, यासाठी तिथलं सरकारही प्रोत्साहन देत असल्याचं दिसून आलंय.

विदेशात अंबानीकडून संपत्तीची खरेदी

अंबानी परिवाराने गेल्या काही काळात विदेशात संपत्ती खरेदी पसंती दिल्याचं पाहायला मिळायं. रिलायन्सने गेल्या वर्षी युकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेडची खरेदी केली होती. तब्बल 79 मिलियन डॉलर मोजून जॉर्जियाई युगातली ही हवेली खरेदी करण्यात आली आहे. इतकंच काय तर अंबानी यांची मुलगी ईशादेखील न्यूयॉर्कमध्ये घर खरेदीसाठी तिचा शोध सुरु असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अंबानींची तिन्ही मुलं सेकंड होमच्या दृष्टीने विदेशात प्रॉपर्टी खरेदीला पसंती देत असल्याचं दिसतंय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.