मुकेश अंबानी यांची मुलं सेटल, अनिल अंबानी यांची मुलं काय करतात?; कुणाकडे कुठली जबाबदारी?

उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी वेगवेगळं झाल्यानंतर आपल्या उद्योगाचं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मुकेश अंबानी यांना प्रचंड यश आलं आहे. तर अनिल अंबानी यांचा उद्योग घाट्यात चाललेला आहे.

मुकेश अंबानी यांची मुलं सेटल, अनिल अंबानी यांची मुलं काय करतात?; कुणाकडे कुठली जबाबदारी?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 3:46 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) नेहमी चर्चेत असते. त्यांचे कुटुंबही तेवढेच चर्चेत असते. कधी उद्योगाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे, कधी एखाद्या नव्या योजनेच्या निमित्ताने, कधी श्रीमंतांच्या यादीत झालेल्या समावेशाने, तर घरगुती पार्टी आणि कुटुंबातील सोहळ्याच्या निमित्ताने मुकेश अंबानी नेहमीच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांची मुलंही (Mukesh Ambani Kids) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्या तुलनेत अनिल अंबानी (Anil Ambani) फारसे चर्चेत नसतात. त्यांची मुलंही चर्चेत नसतात. त्यामुळे अनिल अंबानी यांचं काय चाललंय? त्यांना किती मुलं आहेत? मुलांचं काय चाललं? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स ग्रुप त्यांची दोन मुलं मुकेश अंबांनी आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला. रिलायन्स ग्रुपची विभागणी झाली तेव्हा त्यांची संयुक्त नेटवर्थ 7 अब्ज डॉलर एवढी होती. 2005मध्ये विभागणी झाल्यानंतर बराच बदल झाला आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 83 अब्ज डॉलर झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहेत. तर अनिल अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

अनिल अंबानी यांना दोन मुलं

मुकेश अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी ही त्यांची तीन मुलं आहेत. तर अनिल अंबानी यांना अनमोल अंबानी आणि अंशुल अंबानी ही दोन मुलं आहेत. मुकेश अंबानी यांच्या दोन मुलांची लग्न झाली आहेत. तर अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा अनमोल अंबानी याचा विवाह झाला आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांकडे आला कारभार सोपवला आहे.

कुणाला कोणती जबाबदारी ?

मुकेश अंबानी यांनी आकाश आणि ईशा यांच्याकडे टेलिकॉम आणि रिटेलची जबाबदारी सोपवली आहे. अनंत यांच्याकडे न्यू एनर्जीची जबाबदारी दिली आहे. तर आकाश यांच्याकेड रिलायन्स जियोची जबाबदारी आहे. इशा यांच्याकडे रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे.

अनिल यांच्या मुलांकडे कोणती जबाबदारी ?

अनिल अंबानी हे अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या संकेत स्थळावरील माहितीनुसार त्यांच्याकडे सात कंपन्या आहेत. त्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर, रिलायन्स मुंबई मेट्रो, रिलायन्स रोड्स, रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटचा समावेश आहे. अनिल यांचा मोठा मुलगा अनमोल अंबानी यांनी 2016मध्ये रिलायन्स कॅपिटल बोर्ड ज्वॉईन केला होता. सध्या रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याशिवाय अनमोल आणि अंशुल यांचा 2019मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळात समावेश झालेला आहे.

नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.