Share : अरे हा शेअर आहे की झंझावात..अवघ्या 29 पैशांच्या शेअरने अनेकांना लागली लॉटरी

Share : या छोटा पॅकेट बडा धमाक्याने गुंतणूकदारांना दिवाळीपूर्वीच मालामाल केले आहे..

Share : अरे हा शेअर आहे की झंझावात..अवघ्या 29 पैशांच्या शेअरने अनेकांना लागली लॉटरी
छोटा पॅकेट बडा धमाकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 7:05 PM

नवी दिल्ली : कोविडनंतर (Covid-19) शेअर बाजाराने (Stock Market) अनेक चढ-उतार बघितले आहेत. या धामधुमीतही शेअर बाजारातील काही शेअर्संनी गुंतवणूकदारांना चांगले मालामाल केले आहे. या स्टॉक्सने चांगला परतावा (Stock Return) दिला आहे. बाजारात काही चमत्कार ही झाले आहेत. त्यातीलच या छोटा पॅकेट बडा धमाक्याची ही गोष्ट..

मल्टिबॅगर स्टॉक्सच्या (Multibagger Stock) या यादीत काही पेनी स्टॉक्सने (Penny Stock) कमाल केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना भूतो न भविष्यती असा परतावा दिला आहे. यामध्ये एडविक कॅपिटल शेअर (Advik Capital Share) याने बाजारात तहलका केला आहे.

एडविक कॅपिटल शेअर (Advik Capital Share) सुरुवातीला अगदी 29 पैसे प्रति शेअर होता. त्यानंतर त्यात वाढ होऊन तो 4.20 रुपये प्रति शेअर झाला. या सर्व प्रवासात आणि बाजारातील चढ-उतारात या शेअरने 1,350 टक्के परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात Advik Capital शेअर हा 3.54 रुपये प्रति शेअर होता. तो वाढून 4.20 रुपये प्रति शेअर झाला. त्यामुळे ज्यांनी आताच या शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्यांना या महिन्याभरातच 10 टक्क्यांचा परतावा मिळाला.

गेल्या सहा महिन्यांत या शेअरवर बाजाराचा आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या विक्रीचा दबाव राहिला. हा शेअर 6 रुपयांवर पोहचला होता. तो नंतर 4.20 रुपयांवर घसरला. या शेअरमध्ये जवळपास 35 टक्क्यांची घसरण झाली.

या पेनी स्टॉकने गेल्या काही वर्षांत 35 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा शेअर 2.91 रुपयांवर होता, तो 5.20 रुपयांवर पोहचला. हा मल्टिबॅगर स्टॉक 3.36 रुपयांहून 4.20 रुपयांवर पोहचला होता. त्यावेळी शेअरने 15 टक्क्यांचा परतावा दिला.

तर गेल्या दोन वर्षांत या स्मॉल कॅप स्टॉकने 0.29 पैशांहून थेट 4.20 रुपयांपर्यंत झेप घेतली. या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना 14.50 पट नफा मिळवून दिला आहे.

या पेनी स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी कोविड काळानंतर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांना या शेअरने तब्बल 14.50 लाखांची परतफेड केली आहे. तर एका महिन्यापूर्वी एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला एका लाखांवर 15 हजारांचा फायदा झाला असता.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.