Penny Stock : एका वर्षात पैसा दुप्पट; हा पेनी स्टॉक लवकरच होणार स्प्लिट, किंमती आहे इतकी
Share Market : श्रेष्ठ फिनवेस्ट या कंपनीच्या शेअरने वर्षभरातच गुंतवणूकदारांचा फायदा करुन दिला. आता दुसऱ्यांदा हा स्टॉक स्प्लिट होत आहे. यापूर्वी या कंपनीचे शेअर स्प्लिट 2016 मध्ये झाले होते. काय आहे या मल्टिबॅगर स्टॉकची किंमत?
गेल्या एका वर्षात ज्या पेनी स्टॉकने जोरदार रिटर्न दिला, त्यात श्रेष्ठ फिनवेस्ट या कंपनीचा स्टॉक पण आघाडीवर आहे. 5 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक एका वर्षात दुप्पट झाला आहे. हा शेअर 1.10 रुपयांहून 2.41 रुपयांच्या स्तरावर पोहचला. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर स्प्लिटचा निर्णय जाहीर केला आहे. संचालकांच्या बैठकीत एका शेअरचे दोन हिस्से करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
2 तुकड्यात आता पेनी स्टॉक
कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या घडामोडीची माहिती एक्सचेंजला दिली आहे. 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरचे दोन हिस्से करण्यात येतील. या घडामोडीनंतर शेअरची फेस व्हॅल्यू कमी होऊन 1 रुपये होईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट, तारीख अजून जाहीर केलेली नाही. येत्या काही दिवसात याविषयीचा निर्णय होऊ शकतो.
2016 मध्ये स्टॉक स्प्लिट
कंपनी दुसऱ्यांदा शेअर स्प्लिट करत आहे. यापूर्वी कंपनीने 2016 मध्ये शेअर स्प्लिट केला होता. तेव्हा शेअर 5 भागांमध्ये विभागला गेला होता. तेव्हा झालेल्या शेअर विभाजनानंतर कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू कमी होऊन 2 रुपये प्रति शेअर झाली होती.
शेअर बाजारात दमदार कामगिरी
एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 1.88 रुपये होती. सध्या हा स्टॉक 2.41 रुपयांवर पोहचला. एकाच महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये 25 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर गेल्या 6 महिन्यात पेनी स्टॉकचा भाव 90 टक्के वाढला.
2024 मध्ये श्रेष्ठ फिनवेस्टच्या शेअरमध्ये 85 टक्के तेजी दिसून आली. तर गेल्या एका वर्षापासून हा स्टॉक जवळ बाळगाणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 120 टक्के रिटर्न दिला आहे. त्यांचा पैसा दुप्पट झाला आहे. शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 2.56 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 0.98 रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.