Multibagger Penny Stock | कसला छोटूराम, हा निघाला धनीराम, मालामाल झाले गुंतवणूकदार

Multibagger Penny Stock | भारतीय शेअर बाजार सध्या हेलकावे खात आहे. काल चांगलीच दणआपट दिसली. युद्धाची भीती बाजारावर दिसत आहे. तरीही काही कंपन्यांनी चांगली प्रगती दाखवली आहे. त्यात या दहा रुपयांपेक्षा पण कमी असलेल्या शेअरने जोरदार कामगिरी बजावली. या शेअरला अप्पर सर्किट लागले.

Multibagger Penny Stock | कसला छोटूराम, हा निघाला धनीराम, मालामाल झाले गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 3:39 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात गुरुवारी पडझड झाली. अनेक दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवले. त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य घसरले. बाजारावर सध्या युद्धाचे काळे ढग आहेत. तरीही काही शेअर्सनी मजबूत खेळी खेळली. त्यात या पेनी शेअरने तर सर्वांचे लक्ष वेधले. गुरुवारी हा छोटूराम 5 टक्क्यांनी वधारला. या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर दहा रुपयांच्या आत आहे. पेनी शेअर असल्याने जोखीम अधिक आहे. या शेअरची 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 13 रुपये तर निच्चांक 5.81 रुपये आहे. या कंपनीने गेल्या तीन वर्षांत 400 टक्के परतावा दिला आहे.

जागतिक बाजारात मोठी आघाडी

ही आयटी सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने या वर्षात चांगली कामगिरी बजावली आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 132.19 कोटी रुपये आहे. ही कंपनी नॉयलॉन, रेयॉन, कॉटन आणि फायबरग्लासच्या टेप तयार करते. ही कंपनी आर्थिक सेवा पण देते. अनेक क्षेत्रात कंपनी आघाडी घेत आहे. या कंपनीच्या महसूलाचा आकडा 4,145,378 अमेरिकन डॉलर इतका आहे. जागतिक स्पर्धेत कंपनी अनेक सेवा पुरवत आहे.

हे सुद्धा वाचा

आयटी क्षेत्रात पुढाकार

या कंपनीची उपकंपनी एलएलसीने जागतिक बाजारात आयटी सेवा देऊन नाव कमावले आहे. या सेक्टरमधली ही महत्वाची कंपनी ठरली आहे. दर्जेदार सेवामुळे मूळ कंपनी फायद्यात आली आहे. तिची वृद्धी होत आहे. बाजारातील कंपनीचे भांडवल वाढत आहे. कंपनीचा शेअर सध्या दहा रुपयांच्या आत आहे. कंपनीने यापूर्वी चांगली कामगिरी बजावली आहे.

5 टक्क्यांची भरारी

प्रेशर सेन्सेटिव्ह सिस्टिम (Pressure Sensitive Systems (India)) असं या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचा पेन्नी शेअर सध्या बाजारात चर्चेत आहे. या शेअरने 5 टक्क्यांची मजल मारली. हा शेअर 8.01 रुपयांच्या जवळपास बंद झाला होता. त्यापूर्वी तो 7.63 रुपयांवर ट्रेंड करत होता. या शेअरची 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 13 रुपये तर निच्चांक 5.81 रुपये आहे. या शेअरने गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.