नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : या आठवड्याच्या चौथ्या व्यापारी सत्रात, गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. अनेक कंपन्यांच्या शेअरने चमकदार कामगिरी केली. या मल्टिबॅगर शेअरवर पण त्याचे परिणाम दिसून आले. हा शेअर पण जोरदार वधारला. या शेअरमध्ये 7.4 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर आजच्या सत्रात 252.3 रुपयांवर पोहचला. शेअर गेल्या 52 आठवड्यात 254.90 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात या शेअरने ही कामगिरी केली आहे. आता शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसून आली आहे.
कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर
या कंपनीला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि टेलिकॉमसह अन्य कंपन्यांकडून 924 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने ही माहिती स्टॉक एक्सचेंजला दिली आहे त्यानुसार पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून या कंपनीला 788 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय टेलिकॉमसह इतर कंपन्यांकडून तिला 136 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहे. 40 वर्षांहून अधिक काळापासून ही कंपनी व्यवसाय करत आहे. तिच्या महसूलात पण वाढ झाली आहे.
मल्टिबॅगर रिटर्न देणारा शेअर
स्किपर असे या कंपनीचे नाव आहे. या शेअरने आतापर्यंत मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकची जवळपास 110 टक्क्यांची वृद्धी झाली. तर गेल्या दोन वर्षांत या शेअरमध्ये 220 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये 400 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. या कंपनीकडे ऑर्डरचा ओघ सुरुच आहे. या वर्षात या कंपनीला 2,727 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 220 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. 1981 मध्ये स्किपर पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी सुरु करण्यात आली. पॉलिमर सेगमेंटमध्ये कंपनीचे मोठे काम आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.