Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 वर्षात पैसा डबल; 3 वर्षांपासून स्टॉक देत आहे दमदार रिटर्न, तुम्ही डाव लावणार का?

Multibagger Share : शेअर बाजाराने या आठवड्यात गुंतवणुकदारांना चांगलाच इंगा दाखवला. चार सत्रातील पडझडीने गुंतवणुकदार हवालदिल झाला. पण पटेल इंजिनिअरिंगने एकाच वर्षांत दुप्पट परतावा दिला. तीन वर्षांत या स्टॉकने असे केले मालामाल...

1 वर्षात पैसा डबल; 3 वर्षांपासून स्टॉक देत आहे दमदार रिटर्न, तुम्ही डाव लावणार का?
मल्टिबॅगर शेअरने केले मालामाल
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 5:36 PM

Patel Engineering च्या शेअरने बाजारात चांगली कामगिरी बजावली. गेल्या काही वर्षांत या मल्टिबॅगर स्टॉकने चांगली घौडदौड केली. गेल्या 3 वर्षांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 342 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. 7 मे 2021 रोजी पटेल इंजिनिअरिंगच्या शेअरचा भाव 12.45 रुपये प्रति शेअर असा होता. शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरचा भाव 1.63 टक्क्यांनी वधारला. आता हा स्टॉक 55.96 रुपयांवर व्यापार करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4725.13 रुपयांच्या स्तरावर आहे.

एका वर्षांत पैसे दुप्पट

  1. गेल्या एका वर्षांत बीएसई स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 101 टक्का वाढ दिसून आली. तर याचदरम्यान पटेल इंजिनिअरिंगच्या शेअर्सची किंमत 122 टक्क्यांनी उसळली. अर्थात कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी 2024, सध्याचं वर्ष फार कमालीचे ठरलेले नाही. या दरम्यान कंपनीच्या शेअरच्या किंमतींमध्ये 15 टक्क्यांची घसरण दिसून आली.
  2. पटेल इंजिनिअरिंगचा 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 24.15 रुपये तर 52 आठवड्यातील उच्चांक 79 रुपये प्रति शेअर होता. Trendlyne च्या डेटानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यात केवळ 20 टक्के तेजी दिसून आली.
  3. हे सुद्धा वाचा
  4. बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, ब्रोकरेज हाऊसनुसार, पटेल इंजिनिअरिंगचा शेअर जोरदार कामगिरी करेल. येत्या काळात हा शेअर दमदार कामगिरी करेल. हा शेअर 99 रुपयांपर्यंत उसळी घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कंपनी हायड्रो प्रोजेक्ट्स, धरणं, मोठी बोगदे, रस्ते, रेल्वेशी संबंधित कामे करते. याशिवाय रिअल इस्टेटमध्ये पण कंपनीचा कारभार आहे.
  5. अजून एक स्टॉक मार्सन्स लिमिटेडच्या शेअरने भरभक्कम कामगिरी करुन दाखवली. डिसेंबर 2023 मध्ये हा स्टॉक केवळ 7.75 रुपयांवर होता. त्यानंतर त्याने मोठी झेप घेतली. हा स्टॉक 55.46 रुपयांवर पोहचला. यावर्षी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत या शेअरने 600 टक्क्यांची भरारी घेतली आहे. म्हणजे या 6 महिन्यात या शेअरने 6 पट रिटर्न दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.