Multibagger Share : वाऱ्यागत धावला शेअर, 7 रुपयांहून थेट 29 रुपयांवर घेतली उडी

Multibagger Share : या कंपनीच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदारांसह तज्ज्ञांचे पण लक्ष लागले आहे. मार्च 2023 मध्ये हा शेअर अवघ्या 7 रुपयांना मिळत होता. पण गेल्या सहा वर्षात त्याने मोठी झेप घेतली आहे. या शेअरमध्ये 300 टक्क्यांची उसळी आली आहे. हा शेअर थेट 29 रुपयांवर पोहचला आहे. त्याने घेतलेली ही झेप अनेकांना सुखावणारी आहे.

Multibagger Share : वाऱ्यागत धावला शेअर, 7 रुपयांहून थेट 29 रुपयांवर घेतली उडी
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) काही स्टॉक छुपे रुस्तम आहेत. यापूर्वी ज्या शेअरबाबत गुंतवणूकदारच नाही तर तज्ज्ञ पण सांशक होते. त्यानी मोठी झेप घेतल्याचे समोर आले आहे. अशाच एका शेअरची सध्या चर्चा सुरु आहे. अजूनही हा पेनी स्टॉक (Penny Stock) आहे. पण गेल्या सहा महिन्यात त्याने घेतलेली झेप अनेकांना अंचबित करणारी आहे. काही तज्ज्ञांनी हा शेअर आगेकूच करेल, असा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजावर हा शेअर खरा उतरला. मार्च 2023 मध्ये हा शेअर केवळ 7 रुपयांवर ट्रेड करत होता. पण त्याने मोठी झेप घेतली. हा शेअर आता 29 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 300 टक्क्यांनी झेपावला आहे. तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा स्टॉक?

या कंपनीने केली कमाल

Suzlon Energy Limited ने ही कमाल केली आहे. या आर्थिक वर्षात हा शेअर बाजारात अवघ्या 7 रुपयांना मिळत होता. पण सहा महिन्यात त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला. हा शेअर अजून लांब पल्ला गाठण्याचा दावा करण्यात येत आहे. कंपनीने त्यांच्यावरील कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कंपनीला पुन्हा एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत असल्याचे समोर येत आहे. गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांना या स्टॉकवर भरवसा वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

पवन ऊर्जेत मोठा भागीदार

सुझलॉन एनर्जी कंपनी पवन ऊर्जेत आघाडीची कंपनी आहे. या बाजारात तिचा वाटा जवळपास 33 टक्के आहे. या ऑगस्ट महिन्यात कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली. या कंपनीाल 201.6 MW पवन ऊर्जा तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीकडे इतर ही अनेक ही ऑर्डर आहेत. त्या त्यांना येत्या दोन वर्षांत पूर्ण करायच्या आहेत.

असा धावेल शेअर

हा शेअर सध्या 29 रुपयांच्या घरात आहे. पण तज्ज्ञांच्या मते तो आणखी झेप घेऊ शकतो. ब्रोकर्स फर्मने या शेअरवर भरवसा दाखवला आहे. त्यानुसार, हा शेअर 35 रुपयांपर्यंत मजल मारेल. हा शेअर याठिकाणी दमला नाही तर तो पुढे 40 रुपयांपर्यंत मजल मारेल, असा दावा करण्यात येत आहे. तर या शेअरसाठी 25 रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.