दोन आठवड्याच्या आत पैसा दुप्पट; Semiconductor स्टॉकने केली कमाल, गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Share : Semiconductor कंपनी मोस्चिप टेक्नॉलॉजीजने शेअर बाजारात कमाल दाखवली. शेअरमध्ये गेल्या 12 दिवसांत 100 टक्क्यांची उसळी आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा झाला. त्यांना डबल परतावा मिळाला. या स्टॉकने तुफान घौडदौड केली आहे.
एक छोटी कंपनी मोस्चिप टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी उसळी आली आहे. सेमीकंडक्टर कंपनीने शेअर बाजारात बुधवारी मोठी घौडदौड केली. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीने 13 टक्क्यांहून अधिकची भरारी घेतली आहे. हा शेअर 128.10 रुपयांहून वाढून 257.65 रुपयांवर पोहचला आहे. शेअरने 12 दिवसांतच दुप्पट परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील निच्चांकावर 74.45 रुपयांवर होता. आता त्याने दमदार कामगिरी बजावली आहे.
12 दिवसांत रक्कम दुप्पट
सेमीकंडक्टर आणि सिस्टम डिझाईन सर्व्हिस कंपनी मोस्चिप टेक्नॉलॉजीजचा (MosChip Technologies) शेअर 12 दिवसांत 100 टक्के वधारला. कंपनीच्या शेअरने 12 दिवसांत लोकांचा पैसा दुप्पट केला. मोस्चिप टेक्नॉलॉजीजचा शेअर 31 मे 2024 रोजी 128.10 रुपयांच्या स्तरावर होता. कंपनीचा शेअर बुधवारी 19 जून 2024 रोजी 257.65 रुपयांवर होता. इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सेमीकंडक्टर DLI योजनेतंर्गत कंपनीचे अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर 4 दिवसांत कंपनीने शेअर्समध्ये 44 टक्क्यांहून अधिकची उसळी आली आहे.
6 महिन्यात 150 टक्क्यांची उसळी
मोस्चिप टेक्नॉलॉजीजचा शेअर गेल्या 6 महिन्यात 150 टक्क्यांहून अधिकने उसळला. कंपनीचा शेअर 19 डिसेंबर 2023 रोजी 100.19 रुपयांवर होता. मोस्चिप टेक्नॉलॉजीजचा शेअर 19 जून 2024 रोजी 257.65 रुपयांवर पोहचला. एका वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 205 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 19 जून 2023 रोजी 81.19 रुपयांवर होता. मोस्चिप टेक्नॉलॉजीजचा शेअर 19 जून 2024 रोजी हा शेअर 257.65 रुपयांवर पोहचला होता. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 1550 रुपयांची उसळी दिसून आली. या कालावधीत कंपनीचा शेअर 15 रुपयांहून वाढून 250 रुपयांवर पोहचला.
शेअर बाजाराचा नवीन रेकॉर्ड
या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराने अजून एक रेकॉर्ड नावावर नोंदवला. चढउताराच्या सत्रात सेन्सेक्स 77851.63 अंकाच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. तर ट्रेडिंगच्या अखेरच्या टप्प्यात सेन्सेक्स 36.45 अंकांनी वधारला. तो 77.337.59 अंकांच्या नवीन उच्चांकावर बंद झाला. निफ्टीला मात्र सूर गवसला नाही. निफ्टी 41.90 अंकांनी घसरला. तो 23,516 अंकावर बंद झाला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.