नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही दिवसांपासून तेजीचे सत्र होते. तर आता घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यात तर शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची परीक्षाच घेतली. अनेकांना झटका बसला. तरीही काही शेअर्सनी बाजारात जोरदार कामगिरी बजावली. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवला. यामध्ये एलटी फुड्स (LT Foods) या कंपनीने पण कमाल केली आहे. गेल्या दहा वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांचा परतावा दिला. गेल्या सहा महिन्यांमध्ये या शेअरमध्ये 600 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. तीन वर्षांत शेअरधारकांना कंपनीने 495 टक्के नफा मिळवून दिला. विशेष म्हणजे अजूनही या कंपनीचा शेअर 200 रुपयांपेक्षा कमी आहे. ही एक प्रकारे चांगली संधी आहे.
काय करते कंपनी
एलटी फुड्स कंपनी (LT Foods) FMCG सेक्टरमधील मोठी कंपनी आहे. ही कंपनी तांदळाची विक्री करते. ही या सेक्टरमधील अग्रगण्य कंपनी आहे. दावत या नावाने ही कंपनी भारतात तांदळाची विक्री करते. तर उत्तर अमेरिकेत ही कंपनी रॉयल नावाने तांदळाची विक्री करते. LT Foods च्या ताज्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रमोटर्सकडे 51 टक्के वाटा आहे. तर उर्वरीत 49 टक्के वाटा गुंतवणूकदारांकडे आहे. या गुंतवणुकीतून तज्ज्ञांचा या कंपनीवर भरवसा वाढला आहे. भविष्यात हा शेअर चांगली कामगिरी करण्याची शक्यता वाढली आहे.
एका वर्षातील कामगिरी
शुक्रवारी LT Foods चा शेअर बीएसईवर 2.65 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 158.20 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 60 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. तर एका वर्षापूर्वी या कंपनीत गुंतवणूक करुन ती शाबूत ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 40 टक्के परतावा मिळाला आहे. पब्लिक शेअर होल्डिंगमध्ये म्युच्युअल फंडकडे 2.84 टक्के, परदेशी गुंतवणूकदारांकडे 5.93 टक्के तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 16.13 टक्के वाटा आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.