Multibagger Share : अररा खतरनाक! 2 रुपयांच्या शेअरने आणली त्सुनामी, 1 लाखाचे केले इतके कोटी

Multibagger Share : बाजारात काही शेअर धमाका करतात. त्यांचा परतावा पाहुन डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अवघ्या 2 रुपयांच्या शेअरने अशी कमाल केली आहे. काही वर्षांतच हा शेअर पाहता पाहता गगनाला भिडला. या शेअर ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तो मालामाल झाला आहे. कोणता आहे हा शेअर, कसे केले त्याने एक लाखांचे कोटी?

Multibagger Share : अररा खतरनाक! 2 रुपयांच्या शेअरने आणली त्सुनामी, 1 लाखाचे केले इतके कोटी
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 8:50 AM

नवी दिल्ली |10 सप्टेंबर 2023 : काही शेअर बाजारात (Share Market) धुमाकूळ घालतात. हे बाजारातील छुपे रुस्तम अचानक येऊन चांगल्या कंपन्यांना धोबीपछाड देतात. त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या गुंतवणूकदारांना असा परतावा देतात की त्यांच्या पोटात आनंद काही मावत नाही. या शेअरने अशीच कमाल केली आहे. अवघ्या 2 रुपयांच्या या शेअरने आता गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. हा शेअर गगनाला भिडला आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांचे तर वारे-न्यारे झाले आहे. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. या मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Share) गुंतवणूकदारांना 33,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर आहे, ते आज मालामाल झाले आहेत. कोणता आहे हा शेअर?

Refex Industries

रेफेक्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने ही कमाल केली आहे. शेअरने 33,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ही रेफ्रिजरंट गॅस तयार करणारी कंपनी आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. या कंपनीचा शेअर अवघ्या 2 रुपयांहून 670 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 923.95 रुपये आहे. तर रेफेक्स इंडस्ट्रीजच्या या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 141.65 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

एका वर्षांत 363 टक्क्यांची उसळी

रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर एका वर्षांत 363 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 12 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर 147.25 रुपयांवर होता. एका वर्षानंतर आता 8 सप्टेंबर 2023 रोजी बीएसईवर हा शेअर 678.95 रुपयांवर बंद झाला. 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने 163 टक्क्यांची घौडदौड केली.

5 वर्षांत 3900 टक्के तेजी

रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर 14 सप्टेंबर 2018 रोजी बीएसईवर 16.81 रुपयांवर होता. 8 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 678.95 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच वर्षांत या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला. त्याने 3938 टक्क्यांचा परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. एका वर्षातील गुंतवणूकही फायदेशीर ठरली.

1 लाखांचे झाले 3 कोटी

Refex Industries चा शेअर 29 ऑगस्ट 2013 रोजी बीएसईवर 2 रुपयांवर होता. हा शेअर 8 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 678.95 रुपयांवर होता. या कालावधीत या शेअरने 33,847 टक्क्यांचा परतावा दिला. 10 वर्षांपूर्वी जर एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 3.39 कोटी रुपये असते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.