Multibagger Stock | चार वर्षांत बदलले नशीब! या शेअरने केला 475 रुपयांचा टप्पा पार

Multibagger Stock | स्टील सेक्टरमधील या कंपनीने गुंतवणूकदारांचे नशीब उघडले. या कंपनीने चार वर्षात मल्टिबॅगर रिटर्न दिल्याने ते मालामाल झाले. या शेअरने चार वर्षात मोठी झेप घेतली हा शेअर 475 रुपयांच्या पुढे गेला आहे. या शेअरमध्ये एकाच महिन्यात 25 टक्के तेजी दिसून आली. कोणती आहे ही कंपनी..

Multibagger Stock | चार वर्षांत बदलले नशीब! या शेअरने केला 475 रुपयांचा टप्पा पार
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 2:37 PM

नवी दिल्ली | 9 February 2024 : शेअर बाजारात अनेक छुपे रुस्तम असतात. ज्यांना या महासागरात डुबकी मारुन मोती काढता येतात. तेच या महासागराचे खरे दर्यावर्दी असतात. त्यांच्यात हाताला माणिक-मोती लागतात. बाजारात या स्टील कंपनीने पण असाच तुफान फायदा मिळवून दिला आहे. ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना चार वर्षानंतर मोठा फायदा मिळाला. या कंपनीचा शेअर फेब्रुवारी 2020 मध्ये अवघ्या 10 रुपयांना होता. तो आता 475 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यावेळी ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल ते तर आज मालामाल झाले आहेत. या शेअरने एकाच महिन्यात 25 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

कोणती आहे ही कंपनी

स्टीलचा एक छोटा प्लँट चालविणारी कंपनी सुरज प्रोडक्ट्स लिमिटेडच्या शेअरने ही कमाल केली आहे. सध्या हा शेअर 2 टक्क्यांनी पिछाडीवर आहे. हा शेअर सध्या 478 रुपयांवर व्यापार करत आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये हा शेअर जवळपास अडीच टक्क्यांच्या मजबुतीने आगेकूच करत होता. तर एका महिन्यात या शेअरचा भाव जवळपास 25 टक्क्यांच्या तेजीसह वधारला. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये जवळपास 16 टक्क्यांची उसळी आली आहे.

हे सुद्धा वाचा

6 महिन्यात मल्टिबॅगर

गेल्या सहा महिन्यात सुरज प्रोडक्ट्सचा शेअर 99 टक्क्यांनी वधारला आहे. 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअरचा भाव जवळपास 240 रुपये होता. आता तो 480 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे सहाच महिन्यात या शेअरने जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. हा शेअर मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत सहभागी झाला आहे. तर गेल्या एका वर्षात या शेअरने 267 टक्क्यांहून अधिक फायदा मिळवून दिला.

4 वर्षांत मोठी तेजी

या शेअरने एका वर्षात मोठी मजल मारली. एका वर्षात या शेअरने 534.50 रुपयांपर्यंतची उच्चांकी झेप घेतली. तर चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपनीचा एक शेअर केवळ 10 रुपयांचा होता. गेल्या चार वर्षांत सुरज प्रोडक्ट्सच्या शेअरने 5,245 टक्क्यांची तेजी नोंदवली. 1991 मध्ये सुरु झालेल्या या छोट्या स्टील कंपनीचा बाजारात मोठा वाटा नाही. पण या कंपनीने कमाल केली आहे. सुरज प्रोडक्ट्स लिमिटेडचे मार्केट कॅप जवळपास 245 कोटी रुपये आहे. तर शेअरचा पीई रेशो 17.72 आहे. तर डिव्हिडंड यील्ड 0.31 टक्के आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.