Multibagger Stock | तीनच वर्षात कोट्यवधींची लॉटरी, 84 पैशांच्या शेअरची कमाल

Multibagger Stock | 15 नोव्हेंबर 2020 मध्ये एका शेअरची किंमत होती 84 पैसे आणि या बुधवारी हा शेअर बाजार बंद झाल्यावर 137 रुपयांवर पोहचला. म्हणजे गेल्या तीन वर्षांत या शेअरने जोरदार कमाई केली. हा स्टॉक जवळपास 16000 टक्क्यांनी वधारला. त्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला.

Multibagger Stock | तीनच वर्षात कोट्यवधींची लॉटरी, 84 पैशांच्या शेअरची कमाल
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 11:29 AM

नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. काही शेअरने दीर्घकालीन लाभ दिला आहे. तर काही स्टॉक तर लॉटरीसारखे आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. अशीच एक कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांची ताबडतोड कमाई करुन दिली. हा शेअर 15 नोव्हेंबर 2020 रोजी 84 पैशांवर ट्रेड करत होता. बुधवारी, 22 नोव्हेंबर 2023 रोजी हा शेअर 137 रुपयांवर बंद झाला. तीनच वर्षांत या शेअरने 16000 टक्क्यांचा रिटर्न दिला. ग्राहकांना छप्परफाड कमाई करता आली.

एका लाखाचे 1.6 कोटी

हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरने तीनच वर्षांत गुंतवणूकदारांचे नशीब उघडले. मे 2020 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 63,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि ती राखून ठेवली. त्यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या गुंतवणुकीची किंमत आज 1 कोटींच्या घरात पोहचली. तर ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले. त्यांना या तीन वर्षांत 1.6 कोटी रुपयांचा परतावा मिळाला. या कंपनीचे बाजारातील भांडवल 208.87 कोटी रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 164.40 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

तीन वर्षांत अशी झाली वाढ

कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून देत आहे. मे 2020 मध्ये हा शेअर अवघ्या 84 पैशांना होता. त्यानंतर तो 31 डिसेंबर 2020 रोजी 2.95 रुपयांवर पोहचला. 2021 मध्ये या स्टॉकने कमला केली. 31 डिसेंबर 2021 रोजी तो 24 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 30 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 71.36 रुपयांवर पोहचला. यावर्षाच्या सुरुवातीला त्यात तेजीचे सत्र कायम होते. त्याने 164 रुपयांचा पल्ला गाठला. त्यानंतर त्यामध्ये घसरण आली. आज हा शेअर 137 रुपयांच्या आसपास आहे. Hazoor Multi Projects ने या कालावधीत गुंतवणूकदारांना 11,762.07 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 57 टक्क्यांनी वाढली. तर गेल्या सहा महिन्यात हा शेअर 9 टक्क्यांनी वाढला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.