Multibagger Stock: घर झाले, दारी चारचाकी आली, एका शेअरने सर्वसामान्यांच्या आयुष्यात कमाल केली

Multibagger Stock: या शेअरने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना एकदाच छप्परफाड कमाई करुन दिली..

Multibagger Stock: घर झाले, दारी चारचाकी आली, एका शेअरने सर्वसामान्यांच्या आयुष्यात कमाल केली
छप्परफाड कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 4:09 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) हजारो शेअर आहेत. तर सर्वसामान्य गुंतवणूकदार (Investors) फायद्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करतो. त्याला बाजारातून कमाईची संधी हवी असते. पण एखाद्या शेअरने (Stock) गुंतवणूकदारांना करोडपती करण्याचे उदाहरणे अत्यंत तोकडी आहेत. एखाद दोन शेअर्सनीच हा मान पटकावला आहे.

बाजारात जोरदार कमाई करुन देणाऱ्या आणि परतावा देणाऱ्या शेअरला मल्टिबॅगर शेअर (Multibagger Share) म्हणतात. शेअर बाजारात अनेक मल्टिबॅगर शेअर आहेत. त्यांच्यापैकी काही स्टॉकने चमत्कार केला आहे.

तर हा शेअर आहे Aegis Logistics. या कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदाराला लखपतीच नव्हे तर करोडपती केले आहे. Aegis Logistics कंपनीने ही कामगिरी काही दशकातच केली आहे.

हे सुद्धा वाचा

जिथे मोठ्या ब्रँडच्या शेअर्सने अजूनही कमाल केलेली नाही. तिथे Aegis Logistics कंपनीने 25 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर्सधारकांना जोरदार परतावा दिला आहे.

25 वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 1 रुपयांच्याही खाली होता. 1 जानेवारी 1999 रोजी हा शेअर अवघ्या 0.60 पैशांना मिळत होता. पण कंपनीने बाजारातही दमखम दाखविला आणि शेअर बाजारातही कमाल केली.

Aegis Logistics शेअरची किंमत आता 300 रुपयांच्या पुढे गेली आहे. 11 जून 2021 रोजी कंपनीचा शेअर NSE वर 380.75 रुपये होता. या शेअरचा 52 आठवड्यातील सर्वात उच्चांक 308 रुपये होता

तर Aegis Logistics शेअरची सर्वात निच्चांकी कामगिरी 167.25 रुपये होती. तर 25 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 297.75 रुपयांवर बंद झाला.

1999 अथवा 2000 मध्ये या कंपनीत 1 रुपये दराने गुंतवणूकदारांनी 1 लाख शेअर खरेदी केले असते. एक लाखांची गुंतवणूक केली असती तर आज या शेअरची किंमत 3 कोटींच्या घरात आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.