Multibagger Stock : 22 कोटी कमावले एकाच दिवसात, या शेअरची एकदम कमाल

Multibagger Stock : या एकट्या शेअरच्या जोरावर दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी 22 कोटींहून अधिकची कमाई केली. या स्टॉकने एका वर्षात 210 टक्के, दोन वर्षांत 375 टक्के तर तीन वर्षांत 1800 टक्के परतावा दिला. कोणती आहे ही कंपनी, ज्यामुळे गुंतवणूकदार झटक्यात मालामाल झाले. जाणून घ्या ही नवलकथा..

Multibagger Stock : 22 कोटी कमावले एकाच दिवसात, या शेअरची एकदम कमाल
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:20 AM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : बुधवारी भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. बाजाराने सकारात्मक धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. BSE Sensex Index आणि NSE Nifty-50 Index दोघांनी पण 0.26 टक्क्यांची उसळी घेतली. निर्देशांक वधारल्याचा फायदा या मल्टिबॅगर शेअरने पण घेतला. हा मल्टिबॅगर शेअर 154.25 पॉईंटने वधारला. या शेअरने 52-आठवड्यातील उच्चांक गाठला. 960 रुपयांवर हा शेअर पोहचला. यापूर्वी हा शेअर 805.75 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजे 154.25 रुपयांची तफावत दिसून आली. या एकट्या शेअरच्या जोरावर दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया ( investor Ashish Kacholia) यांनी 22 कोटींहून अधिकची कमाई केली. ही आकडेवारी समोर येताच या शेअरविषयी जोरदार चर्चा रंगली. अनेक गुंतवणूकदार, तज्ज्ञांनी या शेअरकडे मोर्चा वळवला.

आशिष कचोलिया यांच्याकडे इतके शेअर

दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्याकडे या कंपनीचे 14,84,399 शेअर आहेत. त्यांचा या कंपनीत 2.15 टक्के वाटा आहे. या शेअरने गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी 960 रुपयांची झेप घेतली आहे. या शेअरने एकाच दिवसात 119.25 रुपये प्रती शेअरचा फायदा मिळवून दिला. 14,84,399 शेअरला 154.25 रुपयांनी गुणले तर ही रक्कम 22,89,68,546 रुपये होते. एकाच दिवसात त्यांनी इतकी कमाई केली.

हे सुद्धा वाचा

कंपनीची आर्थिक परिस्थिती

या कंपनीकडे 6000 कोटींपेक्षा अधिकचे भांडवल आहे. CAGR नुसार या शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून या शेअरची किंमत 156 टक्के जास्त आहे. या कंपनीच्या शेअरचा PE, 30.1x, तर ROE हा 42 टक्के आहे. या कंपनीने तिमाही निकाल पण जोरदार दिले आहेत. कंपनीच्या विक्रीत गेल्या दहा वर्षांत 22 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीकडे मोठी ऑर्डर आहे. तसेच यापूर्वीच्या ऑर्डरची पूर्तता करण्याचे काम जोरात सुरु आहे.

या स्टॉकची किंमत तरी काय

GRAVITA INDIA LTD असे या कंपनीचे नाव आहे. हा मल्टिबॅगर स्टॉक ठरला आहे. ही कंपनी 1992 साली स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी रिसायकलिंगचे काम करते, एल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर अनेक वस्तूंच्या रिसायकलिंगचे काम ही कंपनी करते. या स्टॉकने एका वर्षात 210 टक्के, दोन वर्षांत 375 टक्के तर तीन वर्षांत 1800 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.