एका दिवसातच केले कोट्याधीश, MRF ला टाकले मागे महागाईत, Elcid Investment कंपनीचा माहिती आहे का अजून एक रेकॉर्ड?

Multibagger Stock : Elcid Investment कंपनीच्या स्टॉकने शेअर बाजारात धमाका केला. कंपनीने एकाच दिवसात कोट्याधीश केले होते. या स्टॉकने केवळ एकाच दिवशी 66,92,535 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला. 3.53 रुपयांहून हा स्टॉक थेट 2,36,250 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. त्याने महागड्या स्टॉकमध्ये MRF कंपनीला मागे टाकले आहे.

एका दिवसातच केले कोट्याधीश, MRF ला टाकले मागे महागाईत, Elcid Investment कंपनीचा माहिती आहे का अजून एक रेकॉर्ड?
असा पण अजून एक रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:59 PM

Elcid Investment च्या स्टॉकने, शेअर बाजारात धमाका केला. कंपनीने एकाच दिवसात गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले . या शेअरने एकाच दिवशी 66,92,535 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला होता. धनत्रयोदशीला या स्टॉकने गुंतवणूकदारांना दिवाळीत लॉटरीत लावली. धनत्रयोदशीला, एकाच दिवशी कंपनीचा स्टॉक 3.53 रुपयांहून थेट 2,36,250 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. या शेअरने MRF कंपनीच्या महागड्या स्टॉकला मात दिली. या कंपनीने अजून एक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. लाभांश वाटपात पण ही कंपनी मागे नाही. या कंपनीमुळे गुंतवणूकदार पण शॉकमध्ये आहे. सध्या बाजारात या स्टॉकची एकच चर्चा आहे. पेनी स्टॉक इतकी मोठी भरारी कशी घेऊ शकतो, यावर काथ्याकूट सुरू आहे. गुगल सर्च इंजिनवर त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.

या कंपनीचा मालक कोण?

एल्सिड इन्वेस्टमेंट्स कंपनीचा स्टॉक देशातील सर्वात महागड्या स्टॉकपैकी एक ठरला आहे. यामागे या कंपनीतील कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका आहे. Elcid investment चे बोर्ड ऑफ मेम्बर्स मध्ये वरुण अमर वकील, अमृता अमर वकील, एस्साजी गुलाम वाहनवती आणि कार्तिकेय ध्रुव काजी या नावांचा समावेश आहे. वरुण अमर मलिक कंपनीचे नॉन एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंड डायरेक्टर आहेत. तर अमृता अमर वकील गैर-कार्यकारी गैर-स्वतंत्र संचालक आहे. तर एस्साजी गुलाम वाहनवती आणि कार्तिकेय ध्रुव काजी पण त्याच पदावर आहेत. तर रागिणी वरूण वकील या मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. आयुष डोलानी हे कंपनीचे सचिव आहेत.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांना एकाच दिवसात कोट्याधीश करणाऱ्या या कंपनीच्या मालकांची संपत्ती किती आहे? याची सध्या चर्चा आहे. मीडियातील वृत्तानुसार, त्यांच्याकडे 748 कोटींची एकूण संपत्ती आहे. या मालकांच्या कमाईचे इतर पण अनेक स्त्रोत आहेत. पण त्यांना त्यांच्या या कंपनीतून पण चांगली कमाई होते.

या कंपनीचा असा ही रेकॉर्ड

या संपूर्ण वर्षात या कंपनीचा शेअर एकदाच बदलेला दिसला. हा शेअर या 21 जून रोजी 3.53 रुपयांवर पोहचला. तर मंगळवारी, धनत्रयोदिशीला अचानक या शेअरमध्ये मोठी उसळी आली. ज्यांच्याकडे हा शेअर होता, त्यांच्या पोर्टफोलिओतील आकडे झपाट्याने बदलले. हा शेअर थेट 2,36, 250 रुपयांवर पोहचला. एफआरएफ कंपनीचा स्टॉक सध्या 1.2 लाख रुपयांवर आहे.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीने डिव्हिडंड देण्यातही रेकॉर्ड केला आहे. या आर्थिक वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 25 रुपयांचा लाभांश दिला. हा इंडस्ट्रीतील सर्वात जोरदार डिव्हिडंडपैकी एक ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, FY23 मध्ये सुद्धा कंपनीने 25 रुपये लाभांश दिला होता. तर त्यापूर्वी कंपनीने तीन आर्थिक वर्षांत प्रत्येकी 15 रुपयांचा लाभांश दिला होता.

काय काम करते कंपनी?

Elcid Investment, RBI अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील एक नोंदणीकृत गैर बॅकिंग वित्तपुरवठा कंपनी आहे. कंपनीच्या कमाईतील मुख्य स्त्रोत हा त्यांच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. Elcid investment ने एशियन पेंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे पेंट कंपनीत 8500 कोटी म्हणजे 2.95 टक्के वाटा आहे. कंपनीकडे 200,000 शेअर आहेत. त्यातील 150,000 शेअर प्रमोटरोकडे आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.