Multibagger Stock : भावा, हा शेअर एकदम रंपाट, महिन्याभरातच गुंतवणूकदारांचा पैसा डबल

Multibagger Stock : शेअर बाजारात या इटूकल्या-पिटूकल्या शेअरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Multibagger Stock : भावा, हा शेअर एकदम रंपाट, महिन्याभरातच गुंतवणूकदारांचा पैसा डबल
गुंतवणूकदार मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 8:00 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) हजारो शेअर आहेत. अनेक कंपन्या आहेत. पण सगळ्याच कंपन्या एका फटक्यात तुमचं नशीब उघडवतील असं नाही. काही मोठ्या कंपन्यांमध्ये रक्कम डबल (Double Amount) होण्यासाठी मोठा कालावधी जाऊ द्यावा लागतो. पण काही धूमकेतु इतिहास घडवतात. अर्थात त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण इतिहास घडतो आणि गुंतवणूकदार (Investors) त्याचे साक्षीदार होतात हे मात्र नक्की.

तर या छोट्या पॅकेटला स्टॉक मार्केटमध्ये पेनी स्टॉक (Penny Stocks) म्हणतात. पेनी स्टॉक हे बाजारात बेभरवशाचे मानण्यात येतात. याची किंमत अत्यंत कमी असते आणि कमी कालावधीत ते तुम्हाला जबरदस्त कमाई करुन देतात.

काही पेनी स्टॉक कमाई करुन देतात, पण त्यांचे फंडामेंटल योग्य नसल्याचे दिसताच, बाजार त्यांच्यावर लॉकिंगची कारवाई करतो. त्यामुळे तुम्हाला रक्कम काढता येत नाही.

हे सुद्धा वाचा

काही पेनी स्टॉक भविष्यातील मोठे स्टॉक ठरतात. ज्या कंपन्या चांगल्या उद्देशाने बाजारात येतात, त्यांची सुरुवात पेनी स्टॉकने होते. सचोटीने या कंपन्या नाव कमवतात आणि मोठ्या होतात. त्यामुळे तुम्हाला ही मोठा फायदा होतो.

तर या पेनी स्टॉकने ऐन दिवाळीपूर्वीच गुंतवणूकदारांना मालामाल केला आहे. हा शेअर रॉकेटच्या स्पीडने पळाला आहे. गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात या शेअरने दामदुप्पट कमाई करुन दिली आहे.

Filatex Fashion असे या पेनी स्टॉकचे नाव आहे. गेल्या एका महिन्यापासून या शेअरमध्ये कमालीची तेजी दिसून आली. या शेअरची किंमत डबल झाली आहे. सध्या या शेअरचा भाव 15 रुपयांहून अधिक आहे.

Filatex Fashions Limited ही एक भारतीय कंपनी आहे. ती मोजे तयार करते. या कंपनीने महिनाभरातच गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. त्यामुळे साध्या मोजे बनविणाऱ्या कंपनीची घौडदौड थक्क करणारी आहे.

एका महिन्याअगोदर Filatex Fashions चा शेअर 19 सप्टेंबर 2022 रोजी 6.90 रुपये होता. त्यानंतर या शेअरने लांबचा पल्ला गाठला. सध्या हा शेअर त्याच्या दुप्पटीपेक्षा पुढे गेला आहे.

21 ऑक्टोबर 2022 रोजी या शेअरचा भाव 15.50 रुपयांवर बंद झाला आहे. या शेअरने 52 आठवड्यात 16.99 रुपयांच्या सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी 3.86 रुपये आहे.

जाता जाता एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, ती म्हणजे हा काही गुंतवणुकीचा सल्ला नाही. ही केवळ त्या स्टॉकची माहिती आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय कोणतेही पाऊल उचलणे जोखीमचे आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.