Multibagger Stock : सहा महिन्यात तोडले कमाईचे रेकॉर्ड! आता बोनस शेअरची भेट

Multibagger Stock : गेल्या तीन महिन्यात या शेअरने बाजारात जोरदार मुसंडी मारली. गुंतवणूकदारांना या शेअरने 87 टक्के तर गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांचा परतावा दिला. सहा महिन्यांत तर या शेअरने जोरदार उसळी घेतली. आता कंपनी बोनस शेअर देणार असल्याने शेअरने रॉकेट भरारी घेतली आहे.

Multibagger Stock : सहा महिन्यात तोडले कमाईचे रेकॉर्ड! आता बोनस शेअरची भेट
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांना केवळ 6 महिन्यांत 245 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे. इन्फिनियम फार्मोकेमच्या ( Infinium Pharmachem)शेअरने मोठी भरारी घेतली आहे. हा शेअर 147 रुपयांहून 511 रुपयांवर पोहचला आहे. शुक्रवारी व्यापारी सत्रात इन्फिनियम फार्मोकेमच्या शेअरमध्ये जवळपास 4 टक्क्यांची घसरण दिसून आली. हा शेअर 511 रुपयांपर्यंत घसरला. गेल्या तीन महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअरने 87 टक्के तर गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांचा परतावा दिला. आता बोनस शेअरच्या (Bonus Share) चर्चेना या स्टॉकने बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. गुंतवणूकदारांना यामुळे सुखद धक्का बसला आहे.

काय दिली माहिती

शेअर बाजाराला कंपनीने घडामोडींची माहिती दिली. त्यानुसार, सोमवारी 28 ऑगस्ट रोजी इन्फिनियम फार्मोकेम कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत ऑथराईज्ड शेअर कॅपिटल आणि कंपनीच्या मसुद्यातील नियमात बदलांना मंजूरी देण्यात आली. शेअर बाजार नियमकाला याविषयीची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

असा वाढला महसूल

Infinium Pharmachem कंपनीने शेअरधारकांना बोनस शेअर देण्यास मंजूरी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात फार्माच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली. Infinium Pharmachem ने वार्षिक आधारावर 114 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. तर व्यावसायिक नफा 58 टक्क्यांनी वाढला. तो आता 17 कोटींच्या पुढे गेला आहे.

ही आहेत कंपनीची उत्पादनं

औषधी कंपनी Infinium Pharmachem लिमिटेड आयोडीन डेरिव्हेटिव्स, एपीआय आणि आयोडिनेशन रिएक्शन बेस्ट बल्क ड्रग्स तयार करते. इन्फिनियम फार्मोकेम एक इंटिग्रेटेड फार्मा आणि हेल्थ केअर सेगमेंटची कंपनी आहे. इंन्फिनियम फार्माकेम कंपनी अनेक फार्मा केमिकल, बल्क ड्रग्स आणि फार्मा इंटरमीडिएट्स तयार करते. या कंपनीच्या शेअर 17 एप्रिल रोजी 147 रुपयांवर होता. तो आता 530 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर आहे. गुंतवणूकदारांना या कंपनीने 260 टक्क्यांचा परतावा दिला.

या शेअरची पण चर्चा

मल्टिबॅगर स्टॉक जेनसॉल इंजिनिअरिंगने (Gensol Engineering Share) अशीच कमाल केली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना अवघ्या दोन वर्षांतच मालामाल केले आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 2,346 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना जवळपास 110 टक्क्यांचा परतावा दिला आहे. डिसेंबर 2021 मध्ये या शेअरचा भाव 59 रुपयांच्या घरात होता. त्यानंतर या शेअरने रॉकेट भरारी घेतली. गेल्या दोन वर्षांत या शेअरने गगन भरारी घेतली. दोन वर्षांत या शेअरने 3100 टक्के परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. आता या कंपनीने बोनस शेअर देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांना लॉटरी लागणार आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.