Multibagger Stock | गुंतवणूकदारांची तुफान कमाई, तीनच वर्षांत या कंपनीने केले मालामाल

| Updated on: Oct 25, 2023 | 10:20 AM

Multibagger Stock | या कंपनीने दसऱ्यापूर्वीच सीमोल्लंघन केले. गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. गेल्या 3 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिकचा फायदा मिळवून दिला. आता कंपनी शेअरचे विभाजन करणार आहे. त्याची एक्स डेट 27 ऑक्टोबर ही आहे. कंपनीचे शेअर 10 तुकड्यात विभागले जातील.

Multibagger Stock | गुंतवणूकदारांची तुफान कमाई, तीनच वर्षांत या कंपनीने केले मालामाल
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : खाद्यतेल, तूपाचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गेल्या 3 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिकचा नफा मिळवून दिला. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचा शेअर 31 रुपयांच्या जवळपास होता. सध्या या शेअरचा भाव 500 रुपयांच्या पुढे पोहचला आहे. मार्च 2020 पासून ते आतापर्यंत कंपनीने गुंतवणूकदारांना 1508 टक्क्यांचा परतावा दिला आहे. आता कंपनी शेअर स्प्लिट (Split) करणार आहे. सध्या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. तो आता एक रुपयांच्या फेस व्हॅल्यूमध्ये येईल. म्हणजे कंपनी शेअरला 10 तुकड्यात विभाजीत करेल.

असा मिळेल शेअर स्प्लिट

बीसीएल इंडस्ट्रीज (BCL Industries) शेअर स्प्लिट करणार आहे. त्यासाठीची एक्स डेट 27 ऑक्टोबर आहे. सध्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. कंपनी शेअरला 10 तुकड्यात विभाजीत करेल. ज्यांच्याकडे या कंपनीचे 10 शेअर असतील, या शेअर स्प्लिटनंतर त्यांच्याकडील शेअरची संख्या 100 होईल. 26 ऑक्टोबरपर्यंत जे या कंपनीत गुंतवणूक करतील. त्यांना याचा फायदा होईल. ही कंपनी 12 ऑक्टोबर 1992 रोजी कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस दिले होता. एकावर एक बोनसचे गिफ्ट दिले होते.

हे सुद्धा वाचा

काय करते ही कंपनी

बीसीएल इंडस्ट्रीज एफएमसीजी सेक्टरमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी वनस्पती तूप, रिफाईंड एडिबल ऑईल आणि इतर उत्पादन तयार करते. याशिवाय कंपनी दारु आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार ही कंपनी व्यवसायात बदल करणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी दारु उद्योगावर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बठिंडा ऑईल युनिटला बठिंडा डिस्टिलरी युनिट करण्यासाठी मंजूरी दिली आहे.

सोमवारी शेअरमध्ये घसरण

सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 3.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. BSE वर या कंपनीचा शेअर 502 रुपयांच्या जवळपास बंद झाला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1250 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीत 376 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. 10 वर्षांत कंपनीने 3500 टक्क्यांची तेजी नोंदवली. कोरोना काळात या कंपनीने चांगले कमबॅक केले आहे. या शेअरने 3 वर्षांत 1500 टक्के रिटर्न दिला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.