Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Stock 2022 : यंदा या स्टॉकने दिला सर्वाधिक परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल! कंपनी आहे या देशाची..

Best Stock 2022 : या देशातील कंपनीच्या स्टॉकने जगभरातील गुंतवणूकादारांना मालामाल केले आहे..

Best Stock 2022 : यंदा या स्टॉकने दिला सर्वाधिक परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल! कंपनी आहे या देशाची..
जोरदार परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 7:01 PM

नवी दिल्ली : कोविड-19 महामारी काळाता शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची लाटच उसळली होती. पण त्यानंतर रशिया-युक्रेन (Russia ukraine war) या दोन देशात युद्ध भडकले. त्यामुळे जगात आर्थिक मंदी येईल, अशा चर्चा रंगल्या. या चर्चेचे भारतापासून तर विदेशापर्यंत परिणाम दिसून आले. भारतीय शेअर बाजारातून (Stock Market) विदेशी गुंतवणूकदारांनी पळ काढला, प्रचंड विक्री केली. या आव्हानात्मक परिस्थितीतही काही स्टॉकने न भूतो न भविष्यती असा परतावा (Good Return) दिला.

यंदा, 2022 च्या दरम्यान एका स्टॉकने सर्वाधिक परतावा दिला आहे. या शेअरने जानेवारीपासून आतापर्यंत 1,595 टक्के परतावा दिला आहे. यंदा, जगातील सर्वाधिक परतावा देणारा स्टॉक म्हणून तो ओळखल्या जात आहे. ब्लूमबर्ग वर्ल्ड इंडेक्स (Bloomberg World Index) च्या अहवालानुसार, पीटी एडारो मिनरल्स (PT Adaro Minerals Indonesia) या शेअरने ही कमाल केली आहे.

इंडोनेशियाची कंपनी पीटी एडारो मिनरल्सचा शेअर एप्रिल महिन्यात सर्वात उच्चतम पातळीवर व्यापार करत होता. ब्लूमबर्गच्या अहवाला नुसार, 19 एप्रिल 2022 रोजी हा शेअर 29,990 रुपियावर (इंडोनेशियाचे चलन) पोहचला होता.

हे सुद्धा वाचा

जोरदार उसळीनंतर पीटी एडारो मिनरल्सचा शेअर घसरला. सध्या हा स्टॉक 1,710 रुपियावर व्यापार करत आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तुर्की एअरलाईन्सचा क्रमांक आहे. या दुसऱ्या स्टॉकपेक्षा पीटी एडारो मिनरल्सने दुप्पट परतावा दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात हा शेअर अवघ्या 100 रुपिया होता. त्यानंतर त्याने जोरदार उसळी घेत, 2,990 रुपियाचा विक्रम नोंदवला. बुधवारी हा शेअर जवळपास 4.5 अब्ज डॉलर मार्केट कॅपसह 1,695 रुपियावर बंद झाला.

पीटी एडारो मिनरल्स ही इंडोनेशियन कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अॅल्युमिनियम आणि बॅटरी तयार करण्याचे काम करते. कंपनीने 9 महिन्यात 482 टक्क्यांचा फायदा नोंदविला आहे. या कंपनीची विक्री दुप्पट झाली आहे.

या स्टॉकविषयी तज्ज्ञांनी सकारात्मक मत दिले आहे. ब्लूमबर्गने तज्ज्ञांच्या मतांआधारे या स्टॉकविषयी भाकित नोंदविले आहे. त्यानुसार, येत्या 12 महिन्यात या स्टॉकमध्ये अजून 42 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.