हाच खरा खेळाडू! या मल्टिबॅगर स्टॉकचा 5 वर्षांत 1,150 टक्के परतावा

Multibagger Stock | शेअर बाजारात अनेक असे स्टॉक आहेत, ज्यांनी कमी कालावधीत मोठा नफा मिळवून दिला. या सरकारी स्टॉकने पण गुंतवणूकदारांची चांदी केली. या कंपनीला नुकतीच 106 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. या शेअरने बाजाराच्या चढउताराच्या सत्रात 1,150 टक्के परतावा दिला.

हाच खरा खेळाडू! या मल्टिबॅगर स्टॉकचा 5 वर्षांत 1,150 टक्के परतावा
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 9:18 AM

नवी दिल्ली | 17 March 2024 : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी जोरदार परतावा दिला. या स्टॉकची किंमत पण कमी आहे. हे पेन्नी शेअर आहेत. कमी कालावधीत या शेअरने मोठा परतावा दिला. या सरकारी स्टॉकने पण असाच इतिहास रचला आहे. त्याने गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. पाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 1,150% परतावा दिला आहे. या कंपनीला नुकतीच 106 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या मल्टिबॅगर स्टॉकचा आयपीओ पाच वर्षांपूर्वी येऊन गेला.

RVNL ची कमाल

रेल विकास निगम लिमिटेडचा (RVNL) IPO पाच वर्षांपूर्वी आला होता. IPO मार्च 2019 मध्ये 17 ते 19 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बँडवर बाजारात दाखल झाला होता. RVNL चा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर त्याने मोठी कमाल दाखवली नाही. पण त्यानंतर या शेअरने मोठी मजल मारली. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ज्या गुंतवणूकदारांनी त्यावेळची गुंतवणूक कायम ठेवली. त्यांना मोठा फायदा झाला. आता या शेअरने 246 रुपयांच पल्ला गाठला आहे. ज्या तेजीने या शेअरची घौडदौड सुरु आहे, ते पाहता हा शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांचा झाला मोठा फायदा

  • ज्या गुंतवणूकदारांनी या PSU Railway Stock मध्ये गुंतवणूक केली आणि ती कायम ठेवली, ते आज मालामाल झाले आहेत. या गुंतवणूकदारांना पाच वर्षांत 1150 टक्क्यांचा नफा मिळाला आहे. गेल्या एका महिन्यापासून ह स्टॉक कमाल दाखवू शकला नाही. हा स्टॉक जवळपास 2.50 टक्क्यांनी घसरला. YTD आधारावर चार्ट पाहता RVNL शेअरची किंमत जवळपास 182 रुपये प्रति शेअरवरुन 246 रुपये प्रति शेअरवर पोहचल्याचे दिसून येते. या शेअरने जवळपास 35 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे.
  • गेल्या सहा महिन्यात या शेअरची किंमत जवळपास 165 रुपयांहून 246 रुपये प्रति शेअरपर्यंत वाढली आहे. या कालावधीत हा शेअर 50 टक्के वधारला आहे. तर एका वर्षात हा मल्टिबॅगर स्टॉक जवळपास 62 रुपयांहून 246 प्रति शेअरपर्यंत वधारला आहे. हा शेअर 300 टक्क्यांनी वाढला आहे.

या शेअरमुळे तगडी कमाई

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी RVNL मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला फटका बसला असता. ही रक्कम 97,500 रुपयांपर्यंत खाली आली असती. तर या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये गुंतवणूक केली असती तर एक लाखांचे आज 1.35 लाख रुपये झाले असते. सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 1.50 लाख रुपये झाली असती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.