Multibagger Stock | शेअर कसला हा तर परीस! 1 लाखांचे झाले 5 कोटी

Multibagger Stock | शेअर बाजारात जर योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा बंपर फायदा मिळतो. असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. या शेअरने असाच विक्रम केला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. या शेअरने एक लाखाचे आज 5 कोटी रुपये केले आहे.

Multibagger Stock | शेअर कसला हा तर परीस! 1 लाखांचे झाले 5 कोटी
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 3:07 PM

नवी दिल्ली | 3 March 2024 : शेअर बाजारात सातत्याने तेजीचे सत्र आहे. बाजारात तेजीच्या दरम्यान अनेक शेअर्समध्ये पण उसळी आली आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. अनेक शेअर असे आहेत की, त्यांनी बाजाराच्या चढउतारातही गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटिडेचा (Relaxo Footwears) शेअर असाच फायदेशीर ठरला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. कंपनीने 3 वेळा बोनस शेअर दिला आहे. एक लाख रुपयांचे या कंपनीने 5 कोटी रुपये केले. बोनस शेअरच्या जोरावर गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळाला आहे.

मालामाल झाले गुंतवणूकदार

  • वर्ष 2000 मध्ये 1 मार्च रोजी रिलॅक्सो फुटवेअर्सचा शेअर 5 रुपयांवर होता. या काळात जर एखादाने या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 20 हजार शेअर खरेदी करता आले असते. या कंपनीने गुंतवणूकदारांना 2000 सालापासून आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर दिले आहेत.
  • 2000 मध्ये कंपनीने 1:1 प्रमाणानुसार बोनस शेअर दिे. प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर दिला. त्यानंतर वर्ष 2015 मध्ये कंपनीने पुन्हा 1:1 आणि जून 2019 मध्ये 1:1 प्रमाणात बोनस शेअर दिला. बोनस शेअर जोडल्यानंतर एकूण 60 हजार शेअरच्या हिशोबाने जवळपास 5 कोटी रुपये मिळतात.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा नफा

हे सुद्धा वाचा

रिलॅक्सो फुटवियर्स लिमिटेडच्या (Relaxo Footwears) शेअरने गुंतवणूकदारांना दीर्घकालात मोठा नफा मिळवून दिला. गेल्या 10 वर्षात या शेअरने 1100 टक्क्यांचा परतावा दिला आहे. वर्ष 2014 मध्ये 7 मार्च रोजी रिलॅक्सोचा शेअर जवळपास 65 रुपयांवर होता. आता कंपनीचा शेअर 833 रुपयांवर व्यापार करत आहे. या शेअरचा गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक 974 रुपये आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.