10 हजारांचे केले 3 कोटी; 53 पैशांचा शेअर आता 210 रुपयांवर, या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना मिळाला रग्गड पैसा

Multibagger Stock : या शेअरमुळे गुंतवणूकदारांनी रग्गड पैसा कमावला. 53 पैशांचा हा शेअर आता 210 रुपयांवर पोहचला. या शेअरने 10 हजार रुपयांचे 3 कोटी रुपये केले आहे. या स्टॉकने जोरदार परतावा दिला. या कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअरचे गिफ्ट दिले आहे.

10 हजारांचे केले 3 कोटी; 53 पैशांचा शेअर आता 210 रुपयांवर, या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना मिळाला रग्गड पैसा
या शेअरने केले मालामाल
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 4:26 PM

मल्टिबॅगर स्टॉक संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने कमाल केली. या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला. कंपनीच्या स्टॉकने शेअरधारकांना मालामाल केले. ज्यांनी दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली ते तर आज कोट्याधीश झाले. संवर्धन मदरसनचा शेअर गेल्या 24 वर्षांत 53 पैशावरून 210 रुपयांवर पोहचला. कंपनीने या कालावधीत 10 हजारांच्या गुंतवणुकीवर आता 3 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कंपनीने कमाईसोबतच बोनस शेअर देण्यातही कसलीच कंजूषी केली नाही. या कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअरचे गिफ्ट दिले आहे.

10 हजारांचे केले 3 कोटी रुपये

संवर्धन मदरसनचा शेअर 6 ऑक्टोबर 2000 रोजी 53 पैशांवर होता. त्यावेळी ज्यांनी या कंपनीत 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला कंपनीकडून 18,866 शेअर मिळाले असते. कंपनीने वर्ष 2000 पासून शेअरधारकांना 5 वेळा बोनस शेअर दिला. त्याचा विचार करता एकूण शेअरची संख्या 1,43,253 इतकी झाली असती. संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचा शेअर 2 ऑक्टोबर 2024 रोजी बाजार बंद होताना 210.51 रुपयांवर होता. या शेअरमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण झाली. आताच्या बाजार मूल्यानुसार, 1,43,253 शेअरची किंमत 3.01 कोटी रुपये आहे. यामध्ये कंपनीने दिलेल्या लाभांशाचा समावेश नाही.

हे सुद्धा वाचा

कंपनीने दिला 5 वेळा बोनस शेअर

संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने वर्ष 2000 पासून ते आतापर्यंत 5 वेळा बोनस शेअर दिला. कंपनीने नोव्हेंबर 2000 मध्ये 1:2 प्रमाणात बोनस शेअर दिला. कंपनीने हर 2 शेअरवर 1 बोनस शेअर दिला. ऑक्टोबर 2012 मध्ये पुन्हा कंपनीने 1:2 प्रमाणात बोनस शेअर दिला. डिसेंबर 2013 मध्ये आणि जुलै 2017 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना पु्न्हा 1:2 प्रमाणात बोनस शेअर केला. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने त्याच प्रमाणात बोनस शेअर दिला. संवर्धन मदरसन कंपनी ऑटो कंपोनंट अँड इक्विपमेंट इंडस्ट्रीत जोरदार काम करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 217 रुपये तर निच्चांक 86.80 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.