Multibagger Stock : एकदम सूसाट, 1 लाखांचे केले 80 लाख! तीनच वर्षांत या Share चा चमत्कार

Multibagger Stock : या कंपनीने गुंतवणूकदारांची चांदीच चांदी केली. गेल्या पाच वर्षांत या शेअरची किंमत 6,109.52 टक्क्यांनी वधारली. या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. इतका झाला फायदा

Multibagger Stock : एकदम सूसाट, 1 लाखांचे केले 80 लाख! तीनच वर्षांत या Share चा चमत्कार
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 2:56 PM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) अनेक स्टॉक आहेत. त्यापैकी काही कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात. या मल्टिबॅगर शेअरमुळे (Multibagger Stock) गुंतवणूकदारांना लॉटरी लागते. बाजारात या शेअरने पण असाच धुमाकूळ घातला आहे. हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअने गेल्या तीनच वर्षांत गुंतवणूकदारांना (Investors) इतका पैसा दिला की त्यांना तो ठेवायला तिजोरी पण अपुरी पडली आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरच्या किंमतीत 6,109.52 टक्क्यांची वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी हा शेअर 15.40 रुपयावर होता. आता हा शेअर 1238.80 रुपयांवर पोहचला आहे.  तीन वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयांचे 80 लाख रुपये केले आहे. या चमत्कारामुळे गुंतवणूकदारांचा एका पायावर भांगडा सुरु आहे.

मिळाली मोठी ऑर्डर

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी (Waree Renewable Technology) ही कंपनी सोलर इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन क्षेत्रात काम करते. ही एक दिग्गज कंपनी आहे. या कंपनीला सोलर प्रोजेक्ट्सचे एक मोठे काम मिळाले आहे. या कंपनीला 52.6 MPW सोलर प्रकल्प उभा करायचा आहे. या वर्षाच्या अखेरीस हे काम त्यांना पूर्ण करायचे आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.

हे सुद्धा वाचा

बुधवारी शेअर पोहचला गगनाला

वारी समूहाच्या या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. एका महिन्यात या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली. पण नवीन ऑर्डर मिळाल्याच्या वृत्ताने कंपनीच्या शेअरवर पण उड्या पडल्या. बुधवारी Waree Renewable Technology च्या शेअरने 1280 रुपयांचा स्तर गाठला. हा गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी धडक होती. शेअर बाजार बंद होताना त्यात किंचित घसरण दिसली. एकाच दिवसात शेअरमध्ये 0.38 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 1238.80 रुपयांवर बंद झाला.

तीन वर्षांत 7900 टक्के रिटर्न

हा शेअर 11 सप्टेंबर 2020 रोजी 15.40 रुपयावर होता. आता या शेअरने 7950 टक्क्यांची उसळी घेतली आहे. शेअरची किंमत 1238.80 रुपयांवर पोहचला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे मूल्य 80 लाख रुपये झाले असते. लॉटरीचे तिकिट न घेता पण गुंतवणूकदारांना अशी लॉटरी लागली असती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.