Multibagger Stocks : करोडपती करणारा शेअर शोधू तरी कसा? ही ट्रिक करेल मालामाल

Multibagger Stocks : करोडपती होण्यासाठी मल्टिबॅगर शेअर शोधावा तरी कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी काय बरं टिप्स असतील? इतक्या शेअरमध्ये चांगला शेअर शोधण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतील..

Multibagger Stocks : करोडपती करणारा शेअर शोधू तरी कसा? ही ट्रिक करेल मालामाल
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Stock Market) प्रत्येक गुंतवणूकदारांना लवकरात लवकर कमाई करणारा स्टॉक हवा असतो. गुंतवणूकदार सातत्याने मल्टिबॅगर स्टॉकच्या शोधात असतो. त्याला अगदी कमी वर्षांत मालामाल करणारा शेअर हवा असतो. 3 ते 10 वर्षांत अनेक पटीत परतावा (Multibagger Returns) देणारा स्टॉक प्रत्येकाला हवा असतो. काही गुंतवणूकदार कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. पेन्नी स्टॉकने काही वर्षात चांगला परतावा द्यावा अशी अनेकांची इच्छा असते. गुंतवणूकदारांना असे शेअर एखाद्या लॉटरीसारखे असतात. शेअर बाजारात असे काही शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना 100 पट्टीत परतावा दिला आहे. करोडपती होण्यासाठी मल्टिबॅगर शेअर शोधावा तरी कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी काय बरं टिप्स असतील? इतक्या शेअरमध्ये चांगला शेअर शोधण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतील..

अनेक मोठ्या कंपन्यांचा 100 पट्ट परतावा

बीएसई सेन्सेक्सवर 1979 मध्ये जो स्टॉक 100 रुपयांच्या आत होता. तो फेब्रुवारी 2006 मध्ये 10,000 अंकांच्या उसळीसह 100 पट्ट वाढला. अशा डझनभर कंपन्या आहेत. इन्फोसिस, टायटन, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स सह अनेक कंपन्यांचे शेअर आता 100 पट्ट परतावा देत आहेत. त्यासाठी मोठा कालावधी लागला.

हे सुद्धा वाचा

कसा ओळखणार मल्टिबॅगर स्टॉक

करोडपती होण्यासाठी मल्टिबॅगर शेअर शोधावा तरी कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी काय बरं टिप्स असतील? इतक्या शेअरमध्ये चांगला शेअर शोधण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतील..

पीई रेशो वर ठेवा लक्ष

ईपीएस ही महत्वाची गोष्ट आहे. प्राईस अर्निंग मल्टिपल वा पीई रेशोत सातत्याने वाढ होणे गरजेची आहे. हा रेशो केवळ शेअर किती महाग झाला याची माहिती देत नाही तर शेअरचे मूल्य किती वधारले. त्यातील गुंतवणूक किती फायद्याचे आहे, ते पण समोर येते. कंपनी त्या सेक्टरमधील गुंतवणूकदारांसाठी किती मुल्यवान आहे, हे पण यातून दिसते. कंपनीची क्षमता वाढली की नाही. कंपनीचे मूल्य किती आहे. कंपनीची किती प्रगती झाली हे सर्व पीई रेशोवरुन समोर येते. अशा कंपन्यांची माहिती ठेवा. त्यांचा आलेख सतत तपासा.

लहान कंपन्यांची कमाल

मोठंमोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्या तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात. या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरु शकते. बाजारात 2% वाटा असणारी कंपनीने बाजारात आगेकूच करणे आवश्यक आहे. अशा कंपनी शोधणे हे महत्वाचे काम तुम्हाला करता यायला हवे. ज्यांचे मार्केट कॅप 5,000 ते 3000 कोटींच्या दरम्यान आहे, अशा कंपन्यांवर लक्ष ठेवा. त्यांच्यासंबंधीची माहिती गोळा करा.

हे सूत्र लक्षात ठेवा

100 पट्टीत परतावा देणारा स्टॉक निवडण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा. समजा तुम्हाला 30 वर्षांत तुमची एक लाखांची गुंतवणूक एक कोटी रुपये करायची आहे. तर त्यासाठी वार्षिक 16.6 टक्के परतावा मिळणे आवश्यक आहे. पण हा परतावा निश्चित नसतो. त्यानुसार, गुंतवणूक पण वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार गुंतवणूकीचे गणित जपावे लागेल.

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.