Mumbai CNG Rate : सीएनजीच्या दरात वाढ सुरूच, सीएनजी 6 रुपयांनी महागला

मुंबईत सीएनजी (CNG Rates) आणि पीएनजीचे दर (PNG Rate) वाढले आहेत. सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Mumbai CNG Rate : सीएनजीच्या दरात वाढ सुरूच, सीएनजी 6 रुपयांनी महागला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:28 AM

मुंबई :  महागाईमुळे (inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आता यामध्ये भर म्हणजे पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी (CNG Rates) आणि पीएनजीचे दर (PNG Rate) वाढले आहेत. सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो 52. 50 रुपयांवर पोहोचले आहेत. नवी दरवाढ आजपासून लागू झाल्याने मुंबईकरांना आता सीएनजीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एवढंच नव्हे तर पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे खर्चात 44 टक्के बचत होत असल्याचा दावा दरवाढीनंतर महानगर गॅस कंपनीकडून करण्यात आला आहे.

दरवाढ सुरूच

एकीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे तब्बल सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे भाव प्रति किलो 86 रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो 52. 50 रुपयांवर पोहोचले आहेत. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. आता यामध्ये त्यांना सीएनजीच्या दरवाढीचा फटका बसताना दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

वाहतूक खर्च वाढणार?

गेल्या वर्षभरात अनेकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र त्यातुलनेत भाडेवाढ न झाल्याने याच मोठा फटका हा रिक्षाचालकांना बसत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जी वाहने सीएनजी इंधनावर चालतात त्यांचे भाडे देखील वाढण्याची शक्यता आहे. भाड्यात वाढ झाल्यास वस्तुंच्या दरात देखील वाढ  होते.  याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.