Mutilated Notes : फाटक्या नोटा विना कमिशन बदलता येतील पटकन, बँकेत मिळते ही सुविधा..
Mutilated Notes : फाटक्या नोटा विना कमिशन बदलता येतील पटकन..
नवी दिल्ली : तुमच्याकडे अनेक वर्षांच्या फाटक्या नोटा असतील, अथवा व्यवहारात (Transaction) अचानक या फाटक्या नोटा (Mutilated Notes) आपल्या माथी मारल्या जातात. त्यानंतर आपणही या नोटांच्या बंडलमध्ये दाबून आपण खपवितो. अशावेळी या नोटा बदलणे गरजेचे आहे. नोटा बदलण्यासाठी (Exchange) बाजारात नोटा खपविण्याची गरज नाही. तर या नोटा विना कमिशन बदलून मिळवू शकतात. ही पद्धत अत्यंत सोपी आहे.
नोटा बदलण्यासाठी आरबीआयचे (RBI)काही नियम आहे. या नोटावर आरबीआयच्या गव्हर्नरचे हस्ताक्षर, गांधीजीचा वॉटरमार्क आणि श्रेणी क्रमांक बघणे आवश्यक आहे. जर नोटांवर हे सुरक्षा मानक असतील तर बँक नोट बदलण्यासाठी नकार देणार नाहीत.
जर तुमच्याकडे 5, 10, 20 अथवा 50 रुपयांच्या फटक्या नोटा असतील. तर या नोटांचा अर्धा हिस्सा तरी असणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर तुम्ही नोट बदलू शकत नाही. जर फाटक्या नोटांची संख्या 20 हून अधिक असतील आणि त्यांचे मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा अधिका असेल तर तुम्हाला या नोटा बदलण्यासाठी काही शुल्क जमा करावे लागेल.
जर तुमच्याकडे नोटांचे अनेक तुकडे असतील तर त्यांना ही नोट बदलता येतात. अर्थात या नोटा बदलण्याची प्रक्रिया थोडी कठिण आहे. या नोटांना रिझर्व्ह बँककडे पोस्टामार्फत पाठवू शकता. त्यासोबत तुमचे बँक खाते क्रमांक, खात्याचे नाव, IFSC कोडची माहिती द्यावी लागेल.
ज्या नोटांचे तुकडे-तुकडे असतात. नोटा जळाल्या असतील. तर या नोटा कोणत्याही साधारण बँकेत बदलू शकत नाही. जर तुम्हाला अशा नोटा बदलायचा असतील तर तुम्हाला थेट RBI शी संपर्क करावे लागेल. जर नोटावर घोषणा, राजकीय संदेश लिहला असेल तर या नोटा बदलता येत नाही.
एवढेच नाही तर बँक अधिकाऱ्याला वाटले, की नोटा जाणीवपूर्वक फाडल्या, कापल्या असतील तर अशा नोटा बँकेत बदलता येत नाही. बँका अशा नोटा बदलून देत नाही. या नोटा बाजारातही चालत नाहीत.