पैसा पायाशी घेईल लोळण; 12X12X24 हा एसआयपीचा फॉर्म्युला माहिती आहे का? काही वर्षांत व्हाल 2 कोटींचे मालक

Mutual Fund SIP : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टेमेंट प्लॅन-SIP विषयी सर्वांनाच माहिती आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. त्याआधारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगसह परतावा मिळतो. 12X12X24 काय आहे हा फॉर्म्युला, कसा करतो काम?

पैसा पायाशी घेईल लोळण; 12X12X24 हा एसआयपीचा फॉर्म्युला माहिती आहे का? काही वर्षांत व्हाल 2 कोटींचे मालक
म्युच्युअल फंड
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 4:47 PM

अनेकांना वाटते की छोटी-छोटी बचत केल्यास त्यातून कधी कोणी करोडपती होऊ शकते का? पण योग्य ठिकाणी बचत केल्यास, गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यास तुमचा पैसा पण चांगला परतावा देऊ शकतो. तुम्ही सुरक्षित ठिकाणी, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून एक ठराविक परतावा मिळेल. म्युच्युअल फंडात शेअर बाजारापेक्षा कमी जोखीम आहे. परतावा पण चांगला मिळतो. अनेक जण म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी 12x12x24 हा फॉर्म्युला उपयोगी ठरू शकतो. या फॉर्म्युला आधारे तुम्ही कमीत कमी 2 कोटी रुपयांचे मालक व्हाल. काय आहे हा फॉर्म्युला, करतो कसे काम?

काय आहे SIP?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन-SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला आहे. आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. त्याआधारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगसह परतावा मिळतो. यामधील परतावा हा इतर बचत योजनांपेक्षा अधिक मिळतो. त्यातून बंपर रिटर्न मिळतो. एसआयपीमुळे एक निश्चित रक्कम दरमहा तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवल्या जाते आणि त्यावर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.

हे सुद्धा वाचा

12x12x24 चा फॉर्म्युला काय?

समजा तुमचे वय 24 वर्षे आहे. अथवा एखाद्या जवळच्या कमावत्या व्यक्तीचे वय 24 वर्षे आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात दरमहा 12,000 रुपयांची गुंतवणूक केली. त्यात कोणताही खंड न पडू देता ही रक्कम 24 वर्षे सलग गुंतवल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही आयुष्याच्या एका वळणावर करोडपती व्हाल.

12 हजार रुपये प्रति महा प्रमाणे तुम्ही सलग 24 वर्षे रक्कम गुंतवत राहाल तर गुंतवणुकीची रक्कम 34.56 लाख रुपये होईल. या गुंतवणुकीवर 12 टक्के दराने तुम्हाला 1,66,16,246 रुपये व्याज मिळेल. म्हणजे मूळ गुंतवणूक आणि व्याज यांची गोळाबेरीज केली तर तुमच्याकडे 2,00,72,246 कोटी रुपये जमा होतील. वयाच्या 48 व्या वर्षी तुम्हाला इतकी मोठी रक्कम मिळेल. म्हणजे वयाच्या निवृत्तीवेळे अगोदरच तुमच्याकडे मोठी रक्कम असेल.

सूचना : हा म्युच्युअल फंडचा केवळ लेखाजोखा आहे. या फंडची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.