Mutual Funds : पैसा ओतला म्हणजे एकदम ओक्के होत नाही, भावा कोणताही म्युच्युअल फंड मालामाल करत नाही, हे आहे कमाईचं गणित..

Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सजग राहणे आवश्यक आहे.

Mutual Funds : पैसा ओतला म्हणजे एकदम ओक्के होत नाही, भावा कोणताही म्युच्युअल फंड मालामाल करत नाही, हे आहे कमाईचं गणित..
डोळस गुंतवणूक ठरेल फायदेशीरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 6:24 PM

नवी दिल्ली : Mutual Funds मध्ये गुंतवणूक केली म्हणजे आता आपण लखपती, करोडपती या भ्रमात असाल तर लगेच बाहेर या. कारण प्रत्येक म्युच्युअल फंड बाजाराच्या (Share Market) अपेक्षाला उतरेलच असे नाही. त्यात तुम्ही केलेली गुंतवणूक (Investment) कधी-कधी एफडी इतकाही परतावा देऊ शकत नाही.

चांगल्या परताव्यासाठी सजगपणे म्युच्युअल फंड निवडणे आणि त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. नाहीतर केलेली गुंतवणूक पाण्यात जाऊ शकते. गुंतवणुकीपूर्वी फंडाची माहिती असणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडाविषयी आता अनेक अॅप्स आणि वेबसाईट आल्या आहेत. काही तर म्युच्युअल फंडाचे रिटर्न, रिस्क याची माहिती देतात. तर काही वेबसाईट त्याविषयीचे स्टार रेटिंग्सही देतात. सर्वांचा योग्य अभ्यास केल्यास ही बाब सहज समजते.

हे सुद्धा वाचा

इक्विटी फंड हा महागाईला मात देण्यासाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड मानण्यात येतो. यामध्ये जोखिम अधिक असते. यामधील जवळपास 65 गुंतवणूक शेअर बाजारात करण्यात येते. त्यामुळे त्यात अधिक फायदा होतो.

इक्विटी फंडात (Equity Fund) कमाई होत असली तरी जोखीमही अधिक आहे. या फंडात दीर्घ गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. कमीत कमी इक्विटी फंडात तीन वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तरच चांगला परतावा मिळेल.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही म्युच्युअल फंडमधील विशेष योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक कर सवलत पात्र ठरते. प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत सूट मिळते. यामध्ये 3 वर्षांची लॉक-इन कालावधी असतो. इक्विटी फंडसारखा फायदा मिळतो.

Debt Funds मधील गुंतवणूक कमी जोखिमीची असते. हा फंड बाँड, कॉर्पोरेट बाँड, गव्हर्मेंट सिक्युरिटी, मनी मार्केट इंस्ट्रुमेंट्स यामध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूकदारांना स्थिर आणि नियमीत कमाई करणे हा या फंडचा उद्देश आहे.

डेट फंडमध्ये परतावा कमी मिळतो. ज्यांना बाजाराची जोखिम नको आहे, त्यांच्यासाठी ही गुंतवणूक चांगली आहे. यामध्ये मुदत ठेवीपेक्षा अधिकचा परतावा मिळतो. कमीत कमी 1 ते 3 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते.

Liquid Funds हा डेट फंडमध्येच येते. या फंडात 1-60 दिवसांसाठी तुम्हाला गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे या योजनेतंर्गत जास्त परतावा मिळत नसला तरी, शनिवार अथवा रविवारी तुम्ही गुंतवणूक रक्कम काढू शकतात.

Hybrid Funds नावाप्रमाणेच हा फंड असतो. इक्विटी आणि डेट फंड या दोन्हीमध्ये या फंडातंर्गत गुंतवणूक केली जाते. यामध्ये जोखिमही कमी असते. त्यामुळे यामधील गुंतवणूक फायद्याची ठरते.

हा फंड बाजारात तेजी असताना त्याचा चांगला फायदा उठवतो. तर बाजारात मंदीचे सत्र सुरु असताना गुंतवणूक वाढवितो. त्याचा फायदा दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.