Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Metro : 8 पदरी महामार्ग, त्यावर उड्डाणपूल, सर्वात वर धावेल मेट्रो, सिनेमात नाही तर या शहरात प्रत्यक्षात दिसेल हे चित्र

Metro : इंजिनिअरिंगचा अद्भूत नजारा या शहरात पहायला मिळणार आहे..

Metro : 8 पदरी महामार्ग, त्यावर उड्डाणपूल, सर्वात वर धावेल मेट्रो, सिनेमात नाही तर या शहरात प्रत्यक्षात दिसेल हे चित्र
वेगवान प्रवासाचा थरारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 5:58 PM

नवी दिल्ली : भारतातील दळणवळणाने कात टाकली आहे. रस्त्यांचे (Road) रुपडे पालटले आहेत. रस्ते हे प्रगतीचे नवीन दालनं उघडत आहेत. वेगवान आणि प्रगतीचं साधन म्हणून रस्ते देशाला नवीन दिशा देत आहेत. पण हा मामला एवढ्यावरच थांबलेला नाही. महामार्ग (Highway), सुपरमार्ग, त्यावर उड्डाणपूल (Flyover) आणि या सर्वांच्या वर मेट्रो (Metro) धावणार आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन देशात एक नवीन प्रयोग होत आहे. त्यामुळे एकाचवेळी दळणवळणाची अनेक साधनं एकाच वेळी मार्गाक्रमण करणार आहेत.

नागपूर मेट्रोने (Nagpur Metro) जगभरात त्यांच्या तंत्रकुशल कामगिरीने जगभरात नाव कोरले आहे. जगातील कोणत्याच देशात होत नसलेली अद्भूत कामगिरी नागपूरमध्ये होत आहे. नागपूर मेट्रोने डबल डेकर वायाडक्ट मेट्रो तयार करुन इतिहास रचला आहे.

3.14 किलोमीटर मार्गावर जगाला अंचबित करणारी किमया घडणार आहे. ही कामगिरी एवढ्यावरच थांबलेली नाही. 8 पदरी महामार्ग (Highway), त्यावर 6 पदरी उड्डाणपूल (Flyover) आणि या सर्वांवर उंचावरुन धावणारी मेट्रो, असा हा सर्व नजारा, चित्रपटातील दृश्यालाही लाजवणारा ठरणार आहे. ही अद्भूत कामगिरी नागपूर मेट्रो इंजिनिअर्संनी फत्ते केली आहे.

हे सुद्धा वाचा

नागपूर मेट्रोचा डबल डेकर वायाडक्टचे निर्माण कार्य अचंबित करणारे आहे. नागपूर मेट्रोने वर्धा रस्त्यावर हा पराक्रम करणार आहे. 3140 मीटर लांब डबल डेकर वायाडक्ट रुटवर 3 मेट्रो स्टेशन असतील. छत्रपती नगर, जय प्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर अशी ही स्थानकं आहेत.

या प्रकल्पात सर्वात खाली महामार्ग आहे. त्याच्यावरती उड्डाणपूल आहे. या सर्वांच्या वरती मेट्रो ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अभियंत्यांनी या प्रकल्पात जगाला थक्क करणारी 3-टियर ट्रांसपोर्टेशन सिस्टम तयार केली आहे. त्यामुळे एकाचवेळी वाहतुकीचे तीन पर्याय खुले होतील.

या प्रकल्पामुळे जमीन संपादनाचा मोठा खर्च वाचविला आहे. एकाच वेळी तीन वाहतूक पर्याय जनतेला उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त खर्चात मोठी बचत झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकल्पाची आणि अभियंत्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

या प्रकल्पाची नोंद इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड, एशिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतल्याने प्रकल्पात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकल्पाची कोनशिला ठेवली होती.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.