नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!

| Updated on: Jan 01, 2021 | 12:53 PM

Most Profitable Crops in 2021 | 10 ते 11 टन वांग्यांचं उत्पादन अपेक्षित, 27 रुपये किलो दराने हैदराबादेत विक्री

नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!
नांदेड : शेतीत वांग्यांची तोडणी करताना पत्नीसह बालाजी डांगे, तब्बल 1 किलो 200 ग्रॅमपर्यंत वांग्यांचं वजन
Follow us on

नांदेड: लोहा तालुक्यातील बालाजी डांगेंना ( Nanded farmer Balaji Dange) अर्ध्या एकरावरील संकरीत वांग्यानं लाखोंची कमाई (huge profit from eggplant crop) करुन दिली आहे. (Nanded Farmer Success Story ) नववर्षाच्या मुहुर्तावर त्यांच्या हाती लक्ष्मी आली आहे. इथल्या पोखरभोशी गावात डांगेंची शेती आहे. नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वांग्याची ( eggplant crop) निवड केली. अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी संकरित आणि सुधारित काळ्या वांग्याची जातीची लागवड केली. सध्या ही वांगी तोडणीला आली आहे, जी डांगेंना लाखोंच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहेत. (Nanded farmers get huge profit from eggplant crop)

वांग्याच्या लागवडीसाठी मल्चिंगचा वापर

बालाजी डांगेंनी नोव्हेंबर महिन्यात जमीन भुसभुशीत करुन घेतली. मातीचे वाफे तयार केले. आणि त्यात बियांची लागवड केली. काही दिवसांतच रोपांनी जमिनीतून डोकं वर काढत आकाशाकडे पाहिलं. त्यानंतर बालाजी डांगेंनी गादीवाफे तयार केले. त्यावर मल्चिंग अंथरलं. आणि गादीवाफ्यावर या रोपांची योग्य अंतर सोडून लागवड केली.

ठिबकनं पाणी वाचवलं, पीकही जोमानं आलं!

मल्चिंग अंथरल्यानंतर सगळ्या गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन करण्यात आलं. दुष्काळी भाग असल्यानं शेतकऱ्यांना पाण्याचं संकट इथं नेहमीच भोगावं लागतं. मात्र, ठिबक सिंचन केल्यामुळं अतिशय कमी पाण्यात वांग्याचं पीक जोमानं आलं. शिवाय मल्चिंगमुळं पाण्याचं होणारं बाष्पीभवनही थांबलं आणि अवघ्या 2 महिन्यांत या झाडांना वांगी लगडली. प्रत्येक वांग्याचं सरासरी वजन 200 ते 500 ग्रॅमच्या दरम्यान आहे.

मेहनतीची वांगी फळाला आली!

एखादी नोकरी करावी अशा प्रकारे बालाजी डांगे शेतीकडे लक्ष देतात. सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते शेतीतच असतात. 6 मजुरांसह खत, पाणी पिकाला देतात. किड-रोगांकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यामुळं वांग्याचा दर्जा सुधारला आहे. परिणामी, वांग्याचं उत्पादन आणि वजनही जास्त भरत आहे.

नववर्षाच्या मुहुर्तावर वांग्यांतून लाखोंचा नफा

लागवडीनंतर अवघ्या 40 दिवसांत ही वांगी तोडणीला आली आहेत. वांग्याचा पहिला तोडाही झाला आहे. ज्यात त्यांना 1 टनापर्यंत वांग्याचं उत्पादन झालं आहे. अजून या पिकातून त्यांना 10 ते 11 टन वांग्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. बाजारात वांग्याला 27 रुपये किलोचा दर मिळत आहे. ही सगळी वांगी बालाजी डांगे हैदराबादला पाठवत आहे. वांग्याचं वजन जास्त आहे, काही वांगी 1 किलो 200 ग्रॅमपर्यंत आहेत. त्यामुळं या पिकात त्यांना फायदाही जास्त होणार आहे. अजून 10 ते 11 टन उत्पादन अपेक्षित धरलं, तर डांगेंना 40 ते 50 दिवसांत 3 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

नव्या वर्षात Amul ची फ्रँचायझी घ्या, बिझनेस सुरु करा, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाखापर्यंत कमवा

 

संबंधित व्हिडीओ:

Nanded | शेतकऱ्यांना मिरची उत्पादनाचा फायदा

 

 

(Nanded farmers get huge profit from eggplant crop)