Khadi Highest Turnover : खादी महामंडळाला बूस्टर, उलाढालीचा टप्पा 1 लाख कोटींच्या पार; रेकॉर्डब्रेक विक्री

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये उलाढाल 95741 कोटी रुपये होती. कोणत्याही एफएमसीजी कंपनीसाठी (FMCG COMPANY) एक लाख कोटी उलाढाल आजवर स्वप्नवत राहिलं होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.

Khadi Highest Turnover : खादी महामंडळाला बूस्टर, उलाढालीचा टप्पा 1 लाख कोटींच्या पार; रेकॉर्डब्रेक विक्री
खादी महामंडळाला बूस्टर, उलाढालीचा टप्पा 1 लाख कोटींच्या पार; रेकॉर्डब्रेक विक्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 7:01 PM

नवी दिल्लीखादीच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये खादीची उलाढाल एक लाख कोटींच्या टप्प्यांपर्यंत पोहोचली आहे. खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळ (केव्हीआयसी) गेल्या आर्थिक वर्षात उलाढाल 1 लाख 15 हजार 415 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये उलाढाल 95741 कोटी रुपये होती. कोणत्याही एफएमसीजी कंपनीसाठी (FMCG COMPANY) एक लाख कोटी उलाढाल आजवर स्वप्नवत राहिलं होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Modi) यांनी खादी वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. नरेंद्र मोदी सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर खादीला अजेंड्यावर स्थान दिलं. वार्षिक आधारावर केव्हीआयसीची उलाढालमध्ये (KVIC TURNOVER) 20.54 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत वाढीचा दर 172 टक्के राहिला.

खादीला स्वदेशीचं पाठबळ:

केव्हीआयसीचे चेअरमन विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान मोदी यांना खादी उद्योगातील उलाढालीसाठी श्रेय दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी स्वदेशीचं धोरण हाती घेतल्यामुळे खादी वापरास मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना खादी उद्योग महामंडळाने हाती घेतल्या आहेत. तसेच विशेष सवलत योजनांची घोषणा केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापरामुळे खादीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे ग्राहकांना वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध झाली आहे.

खादी आकडेवारीत:

खादी विक्रीच्या आधारावर तब्बल 248 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. एप्रिल ते जून 2021 दरम्यान कोविड प्रकोप असताना देखील खादीची मोठी उलाढाल झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये खादी क्षेत्राची 43 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आणि एकूण उलाढाल 5052 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये उलाढाल 3528 कोटी रुपये होती. ग्रामीण क्षेत्राचा विचार करता वार्षिक आधारावर 20 टक्के वाढ झाली होती. गेल्या आर्थिक वर्षात ग्रामीण क्षेत्राची उलाढाल 1 लाख 10 हजार 364 कोटी रुपयांची होती. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 92214 कोटी होते.

हे सुद्धा वाचा

रेकॉर्डब्रेक विक्री

राजधानी नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस स्थित प्रमुख खादीच्या दुकानात एका दिवसात खादीची रेकॉर्डब्रेक विक्री नोंदविली गेली. 30 ऑक्टोबर 2021 मध्ये 1.29 कोटी रुपयांचा टप्पा विक्रीनं गाठला होता. केंद्रीय रोजगार मंत्रालयानं गेल्या काही वर्षांपासून श्रमिक तसेच बेरोजगार युवकांच्या रोजगार कार्यक्षमतेचा विकासावर भर दिला आहे. मोठ्या संख्येत युवकांनी स्वयंरोजगार आणि निर्मिती कृती कार्यक्रमांमुळे ग्रामीण उद्योगांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.