अच्छे दिन! भारतीयांचा स्विस बँकेतील पैसा दोन वर्षांत 212 टक्क्यांनी वाढला; ठेवी 3.83 अब्ज स्विस फ्रँकवर

भारतीयांच्या स्विस बँकेती पैशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये स्विस बँकेतील ठेवी 212 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

अच्छे दिन! भारतीयांचा स्विस बँकेतील पैसा दोन वर्षांत 212 टक्क्यांनी वाढला; ठेवी 3.83 अब्ज स्विस फ्रँकवर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 6:58 AM

नवी दिल्ली : भारतीयांचा स्विस बँकेत (Swiss Bank)पैसे किती असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडत असतो. याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 2021 च्या अखेरीस भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी स्विस बँकेत ठेवलेल्या पैशांमध्ये (Money) 47.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीयांचा स्विस बँकेतील पैसा 3.83 अब्ज स्विस फ्रँक (Swiss franc) म्हणजेच 30,500 कोटींवर पोहोचला आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवीचा हा गेल्या चौदा वर्षांतील उच्चांक आहे. 2020 मध्ये भारतीय व्यक्ती तसेच कंपन्यांकडून स्विस बँकेत एकूण 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी स्विस बँकेत ठेवलेल्या भारतीयांच्या ठेवीमध्ये वाढ झाली आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेच्या वतीने स्विस बँकेत कोणत्या देशाच्या किती पैसा आहे याबाबत एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

दोन वर्षांमध्ये 212 टक्क्यांची वाढ

2006 मध्ये स्विस बँकेत असलेल्या भारतीय व्यक्तींच्या आणि कंपनीच्या ठेवी विक्रमी पातळीवर होत्या. 2006 मध्ये भारतीयाचा स्विस बँकेत एकूण 6.5 अब्ज स्विस फ्रँक एवढा पैसा होता. त्यानंतर तो 2011, 2013, 2017, 2020 आणि 2021 मध्ये त्यात आणखी वाढ झाली. ही काही वर्ष वगळता बाकीच्या वर्षांमध्ये स्विस बँकेतील ठेवींमध्ये घसरण पहायला मिळत आहे. स्विस बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी स्विस बँकेत जमा केलेला पैसा 20 हजार 700 कोटींवर पोहोचला आहे. हा गेल्या 14 वर्षाती उच्चांक आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेल्या पैशांमध्ये तब्बल 212 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

भारत चौदाव्या क्रमांकावर

भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये 2018 मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार स्विस बँकेत असलेल्या भारतीय खात्यांबाबत स्विस बँकेकडून भारतीय आयकर विभागाला माहिती देण्यात येते. 2019 साली अशाप्रकारे प्रथम माहिती देण्यात आली होती. ज्या खात्यांवर संशय आहे, असा खात्यांची माहिती स्विस बँकेकडून भारत सरकारला देण्यात येते. स्विस बँकेत ब्रिटनचा सर्वाधिक पैसा आहे. ब्रिटन प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज, चौथ्या जर्मनी पाचव्या फ्रान्स, सहाव्या सिंगापूर आणि सात्याव्या स्थानावर हॉंगकॉंग याचा नंबर लागतो. या यादीमध्ये भारत चौदाव्या क्रमांकावर आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.