Tata Water : आता पाण्याला लागणार आग! टाटा समूहाचा ‘पाणीदार’ प्लॅन, बिसलेरीचे मार्केट घेणार ताब्यात
Tata Water : बिसलेरीशी करार फिस्कटल्यानंतर आता टाटा समूह पूर्ण ताकदीनिशी बाजारात उतरणार आहे. टाटा बाटली बंद पाण्याच्या बाजारात आग लावण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी या समूहाने तगडा प्लॅन तयार केला आहे.
नवी दिल्ली : बिसलेरीशी (Bisleri) करार फिस्कटल्यानंतर आता टाटा समूह पूर्ण ताकदीनिशी बाजारात उतरणार आहे. टाटा बाटली बंद पाण्याच्या बाजारात आग लावण्याच्या तयारीत आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात भारतात सध्या बिसलेरीने मांड ठोकलेली आहे. बिसलेरीला सध्या तरी मोठा स्पर्धक नाही. बिसलेरी समूह खरेदी करण्याची बोलणी अचानक फिस्कटली. मूल्यांकनावर हा वाद झाला. अंतिम टप्प्यात बिसलेरी खरेदी करता आल्याने आता टाटा समूह (Tata Group) पूर्ण जिद्दीने, ताकदीनिशी बाजारात उतरणार आहे. बाटलीबदं पाण्याच्या बाजारातील मोठा हिस्सा टाटा समूहाला आता ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठी या समूहाने तगडा प्लॅन तयार केला आहे.
कोट्यवधींचे मार्केट
टाटा समूह एवढ्या आग्रहपूर्वक या व्यवसायात उतरणार म्हटल्यावर हा बाजार किती मोठा असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल. मार्केट रिसर्च आणि ॲडव्हायझरी टेकसाई रिसर्चने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय किरकोळ नाही. 2021 मध्ये हा बाजार 243 कोटी डॉलरचा म्हणजे जवळपास 20,03,89,95,000 रुपयांचा होता. त्यामुळे टाटा समूह या बाजारात त्यांची मांड ठोकू इच्छित आहे.
टाटा समूहाचे हे आहेत ब्रँड
बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात यापूर्वीच टाटा समूह उतरला आहे. टाटा समूहाचे हिमालयन (Himalayan), कॉपर प्लस (Tata Copper+) आणि टाटा ग्लू प्लस ( Tata Gluco+) हे ब्रँड पूर्वीपासूनच बाजारात आहेत. पण या सेगमेंटमध्ये टाटा समूह त्यांची मजबूत पकड करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी हा समूह विस्तार करणार आहे. टाटा समूह टाटा कॉपर प्लस 400 कोटी रुपयांचा आहे आणि हिमालयन हे दोन्ही ब्रँड मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे. फूड ॲंड बेवरेजेस सेगमेंटमध्ये व्यापाराच्या विस्तारासाठी टाटा संशोधन आणि विकासाची सुविधा देणार आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सने (Tata Consumer Products) आता पॅकेज ड्रिकिंग वॉटर विस्तारासाठी योजना आखली आहे.
बिसलेरी का खरेदी करायची होती
टाटा बिसलेरी खरेदी करणार होती. त्यांना बिसलेरी ब्रँड हवाच होता. त्यासाठी जवळपास सर्व तयारी झाली होती. बिसलेरी टाटा समूहात आली असती, तर हा समूह आताच या सेगमेंटमध्ये तीन वर्षे पुढे गेला असता. पॅकेज्ड वॉटर सेगमेंटमध्ये टाटाची मजबूत पकड झाली असती. बाटलीबंद पाण्याचे मार्केट 20 हजार कोटी रुपयांचे आहे. त्यात बिसलेरीचा वाटा 32 टक्के आहे. बिसलेरी टाटाच्या ताफ्यात आली असती तर टाटा या सेगमेंटमध्ये दादा कंपनी झाली असती.