Share Market Big Bull : शेअर बाजारातून दीड शतकापूर्वी कमावले एक लाख, पहिल्या बिग बुलचे नाव काय

Share Market Big Bull : शेअर बाजारात अनेक कोट्याधीश आहेत. अनेक अब्जाधीश आहेत. बिग बुल, वॉरेन बफे काही जणच आहेत. पण पहिला बिग बुल कोण आहे माहिती आहे का? त्यांनी दीडशे वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची कमाई केली होती.

Share Market Big Bull : शेअर बाजारातून दीड शतकापूर्वी कमावले एक लाख, पहिल्या बिग बुलचे नाव काय
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : शेअर बाजाराचे (Share Market) नाव आले की अनेकांना हर्षद मेहता हे नाव पहिल्यांदा आठवतं. तर राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा पोर्टफोलिओ पण अनेक जण फॉलो करतात. त्यांना भारताचे बिग बुल, वॉरेन बफे अशी उपाधी देण्यात आली आहे. त्यांची शिस्त आणि मंत्र जपत अनेक जण शेअर बाजारात आज कमाई करत आहेत. मुंबईत वडाच्या झाडाखाली भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाली होती. बीएसईचा श्रीगणेशा झाला होता. दीडशे वर्षांपूर्वीचा हा घटनाक्रम आहे. पण शेअर बाजारातील पहिले बिग बुल (First Big Bull) कोण आहेत, माहिती आहे का? त्यांचे नाव काय, शेअर बाजाराची सुरुवात करण्यात त्यांचा ही मोठा वाटा होता.

कर्तृत्वच अफाट भारताची आर्थिक राजधानीत पहिले बिझनेस टायकून मध्ये प्रेमचंद रॉयचंद यांचे नाव सर्वात अगोदर घेण्यात येते. बिग बुल, बुलियन किंग आणि कॉटन किंग अशा उपाध्या त्यांना देण्यात आल्या. त्याकाळच्या श्रीमंतामध्ये जमशेदजी टाटा, डेव्हिड ससून आणि जमशेदजी जेजीभॉय यांच्यासह मुंबईतील 4 मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये रॉयचंद यांचे पण नाव होते. नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन्स या नावाने त्यांनी फर्म काढली. ही फर्म पुढे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या नावाने प्रसिद्ध झाली. म्हणजे आताची बीएसईची मुळ स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी केलेली आहे.

कॉटन किंग नावाने लोकप्रिय बीएसई स्थापन्याचे श्रेय प्रेमचंद रॉयचंद यांना जाते. त्यांना कॉटन किंग या नावाने ओळखल्या जाते. 9 जुलै 1875 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नावाने ही फर्म ओळखली गेली. हा भारतीय शेअर बाजाराचा श्रीगणेशा होता. त्याकाळी बीएसई हा आशियातील पहिला स्टॉक एक्सचेंज होता. आज बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्याच्या बाजार भांडवलाने 300 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाखाली बाजार 1855 मध्ये नेटिव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यावेळी दक्षिण मुंबईत एका वटवृक्षा खाली बाजाराला सुरुवात झाली. प्रेमचंद रॉयचंद यांच्या कार्यालयात जवळपास 22 शेअर दलालांनी ट्रेडिंगची सुरुवात केली.

कागदावर नाही तर इथं नोंद प्रेमचंद रॉयचंद यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती. त्यांना कधी कागद आणि लेखणीची गरज पडलीच नाही. त्याकाळचे व्यापारी कागदावर नोंदी ठेवण्याऐवजी अशी आकडेमोड, व्यवहार लक्षात ठेवत. प्रेमचंद रॉयचंद यांनी काही दिवसातच शेअर बाजारात मोठी कमाई केली. 1858 पर्यंत प्रेमचंद यांनी जवळपास 1 लाख रुपयांची कमाई केली होती. 1861 मध्ये अमेरिकन गृहयुद्धानंतर काही वर्षांतच भारत कापसाच्या व्यापाराचे केंद्र बिंदू झाला. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.

स्टॉक ब्रोकर म्हणून सुरुवात रॉयचंद यांचा जन्म 1832 मध्ये सूरत येथील दीपचंद रॉयचंद यांच्या घरी झाला होता. ते लाकडाचे व्यापारी होती. ते कुटुंबियांसह मुंबईत स्थायिक झाले. एल्फिंस्टन कॉलेजमध्ये शिक्षण झाल्यानंतर रॉयचंद यांनी 1852 मध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून करियरला सुरुवात केली होती.

भायखळ्यात होता बंगला प्रेमचंद रॉयचंद हे मुंबईतील भायखळ्यात एका बंगल्यात राहत होते. पुढे या ठिकाणी अनाथालय आणि शाळा सुरु करण्यात आली. 1906 प्रेमचंद यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स (PRS) या नावाने फर्म चालविल्या जाते.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.