ओटीटीच्या बारा भानगडी… कसं असतं OTT रेव्हेन्यू मॉडेल, पैसा कसा येतो अन् कसा जातो? जाणून घ्या

आधी टीव्हीवर ब्रॉडकास्टर्सकडून जे दाखवलं जायचं तेच पाहावं लागयचं. दिवसभर कोणत्या चॅनेल्सवर काय आणि किती वाजता दाखवलं जाणार याबाबतची माहिती निवडक वृत्तपत्रांमध्ये दिली जायची, जे आवर्जुन पाहिलं जायचं. तसेच आवडीचा कार्यक्रम लागायची वाट पाहिली जायची. मात्र तंत्रज्ञान बदललं आणि दिवस फिरले. आता वाटेल ते आवडीनिवडीनुसार पाहता येतं. यामध्ये विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोठं योगदान आहे. मात्र या ओटीटीची सुरूवात कशी झाली? ओटीटी कंपनी कशा वाढल्या? त्यांची कमाई कशी होते? जाणून घ्या.

ओटीटीच्या बारा भानगडी... कसं असतं OTT रेव्हेन्यू मॉडेल, पैसा कसा येतो अन् कसा जातो? जाणून घ्या
OTT Revenue Model in Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 10:10 PM

चित्रपटसृष्टीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.  सुरूवातीला ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यावर फिल्म इंडस्ट्रीने मजबूत पैसा छापला. मात्र दिवस फिरलेत, आधी ओटीटी कंपन्या चित्रपटांसाठी कोटी रूपये देत त्याचे हक्क विकत घेत होते. आता ओटीटी कंपन्यांकडे चित्रपट घेऊन जावं लागत आहे. सिनेमा हॉलमध्ये जाण्यापेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढलाय. हा बदल कसा झाला आणि प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे का आकर्षित होतोय जाणून घ्या.

ओटीटी म्हणजे काय?

ओटीटी म्हणजे Over the Top, बाजारात असे आता अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यावर सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका आपण पाहू शकतो. तुम्हाला प्रत्येक कॅटेगिरीमधील चित्रपट आणि वेब सीरीज असतात. काही OTT प्लॅटफॉर्म मोफत तर काहींचा प्रीमियम भरावा लागतो. भारतात ओटीटी कंपनी कधीपासून वाढल्या? या ओटीटी कंपन्यांचा व्यवसाय चालतो तरी कसा? याविषयीची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

ओटीटी आधीचा थोडक्यात इतिहास

भारतामध्ये 15 ऑगस्ट 1982 मध्ये पहिल्यांदा दुरदर्शन चॅनेल सॅटेलाईटचा वापर करत कलरमध्ये दिसला. ब्लॅक अँड व्हाईटनंतर पडद्यावरील चित्र रंगीत स्वरूपात दिसत होते. 2000 मध्ये भारत सरकारने टीव्ही सॅटेलाईटसाठी परवानगी दिली. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2003 साली झी कंपनीने पहिली डिश टीव्ही (Dish TV) सुरू झाली, ज्यावर एकावेळी अनेक चॅनेल पाहता येत होते. त्यासोबतच त्यावेळी घरोघरी केबल होती. दर महिन्याला केबलसाठी पैसे द्यावे लागायचे. तेव्हा डिश टीव्हीने केबल वाल्यांसोबत कोणतीही स्पर्धा न करता ज्या भागात केबल नाही खास करून ग्रामीण भागात सेवा देण्यावर लक्ष दिलं होतं. त्यानंतर बाजारात डिश कंपनी आल्या आणि त्यांच्यात ग्राहकांनी खेचण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने डिसेंबर 2004 मध्ये डीडी फ्री डिश लाँच केलेली. टाटा प्ले कंपनी 2006 तर सन डायरेक्ट आणि एअरटेल डिजिटल टीव्ही कंपन्यांनी अनुक्रमे 2007 आणि 2008 मध्ये सेवा सुरू केली.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरूवात

भारतामध्ये पहिली ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरूवात रिलायन्स एन्टरटेनमेंटने केली. Big Flix असं ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव असून त्याची सुरूवात 2008 ला झाली होती. यावर तुम्हाला प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. रिलायन्स कंपनीचं बिझनेस मॉडेलच (Pay Per View Buisness Model) या पद्धतीचं होतं. त्यानंतर 2013 ला खऱ्या अर्थाने ओटीटी प्लॅटफॉर्म आले. 2013 साली झी कंपनीने ditto Tv ओटीटी प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आणलं, यावर झी चे चॅनल आणि त्यावरील मालिका होत्या. सोनी लाईव्ह Sony Live लाँन्च करण्यात आलं. 2015 ला हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म बाजारात आला. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचं आताचे नाव Disnet Plus Hotstar असं आहे.

सर्वात चर्चेत आणि आकर्षण असणाऱ्या (NETFLIX) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटॉर्मची भारतामध्ये 2016 मध्ये एन्ट्री झाली. नेटफ्लिकवरील वेब सीरीज आणि सिनेमे दर्जेदार असतात असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला माहिती का नेटफ्लिक्स ही खूप जुनी कंपनी आहे. NETFLIX कंपनीची 1998 साली वेबसाईट होती. त्यावेळी नेटफ्लिक्सचं एका महिन्याचे पैसे दिल्यावर तुम्हाला जो सिनेमा पाहायचा आहे त्याची DVD घरी पोहोचवली जायची. 2009 मध्ये नेटफ्लिक्स या कंपनीने TV Consoles सोबत करार केला. त्यानंतर 2010 मध्ये सोनी (Sony), पॅरामाऊंट (Paramount) आणि डिझनी (Disney) या फिल्म प्रोडक्शनकडून सिनेमे विकत घेतले. हे जास्त खर्चिक होत असल्याने त्यांनी स्वत: ओरिजनल शो बनवण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये नेटफ्लिक्सने पहिल्यांदा House of Cards आणि Orange is in the New Black असे दोन शो सुरू केले होते. त्यांना यातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

भारताता आता जवळपास 40 पेक्षा जास्त ओटीटी कंपन्या आहेत. यामधील हाताच्या बोटांवर मोजता येतील अशाच आपल्याला माहिती आहेत. मात्र अशा इतरही अनेक ओटीटी कंपन्या आहेत. इतके सारे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत मग यांचा व्यवसाय नेमका कसा चालतो? फायदा होतो तरी कसा? कसं असतं नेमकं बिझनेस मॉडेल जाणून घ्या.

प्रत्येक ओटीटी कंपन्यांसाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते. ती म्हणजे तुमच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेला कंटेट. कारण तुमच्या ओटीटीवर दर्जेदार सिनेमे, वेब सीरीज किंवा शो नसतील तर प्रेक्षकवर्ग दुसऱ्या ओटीटी कंपनीकडे वळतो. त्यासाठी प्रत्येक ओटीटी कंपनी याची खबरदारी घेते. आपल्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या प्रेक्षकाला काय पाहायला आवडेल यासाठी जास्तीत जास्त व्हरायटी देण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो.

OTT कंपन्यांकडून चित्रपट रीलीज होण्याआधीच खरेदी

प्रत्येक ओटीटी कंपनीकडे दोन पर्याय असतात. यामधील एक म्हणजे सिनेमा, वेब सीरीजचे ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करणे. सिनेमा रीलीज होण्याआधीच ओटीटी कंपनी त्यांचे ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करतात. एखाद्या मोठ्या अभिनेत्याचा चित्रपट येणार असेल तर तो आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसावा यासाठी मोठी रक्कम दिली जाते. अभिनेते कमल हसन यांचा 2022 साली ‘विक्रम’ सिनेमा रीलीज होण्याआधीच 250 कोटींमध्ये त्याचे ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी केले होते. अशा प्रकारे बाजारामध्ये ओटीटी कंपन्या कोटी रूपये देत आपल्याकडे प्रेक्षक खेचतात. पण याचा तोटाही त्यांना झाला, कारण सुरूवातीला त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा प्रोडक्शन हाऊसला दिला पण ते सिनेमे त्या मानाने चालले नाहीत. त्यामुळे कपंनीने प्लॅन बी निवडला.

ओटीटी कंपन्यांनी चित्रपटाचे ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करण्यासाठी पैसे लावण्याऐवजी आता थेट स्वत: पैसे लावायला सुरूवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ओटीटी कंपनीने स्वत: एखादा सिनेमा किंवा वेब सीरीज बनवली असेल तर प्रेक्षकांना त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर दिसते. त्यामुळे ओटीटी कंपनींना कंटेट हा ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करणे किंवा स्वत: पेसे लावत सिनेमा किंवा वेब सीरीज तयार करणे. आता हे झालं कंटेट इतका पैसा खर्च केल्यावर हा पैसा वसुल कसा करायचा? नफा कसा मिळणार? तर ओटीटी कंपन्यांचे चार बिझनेस मॉडेल असतात.

ओटीटी कंपन्यांचे चार बिझनेस मॉडेल (Four Business Models of OTT Companies)

1. AVOD (Advertising Based video on Demand)

2. SVOD (Subsription Based video on Demand)

3. TVOD (Transactional Based video on Demand)

4. Hybrid Model

1. AVOD बिझनेस मॉडल म्हणजे काय?

या मॉडेलमध्ये येणाऱ्या ओटीटी कंपन्यांचे सर्व सिनेमे, वेब सीरीज आणि इतर शो हे प्रेक्षकांना फ्रीमध्ये पाहता येतात. यासाठी कोणतेही शुल्क संबंधित ओटीटी कपंनी घेत नाही. मात्र तुम्ही या ओटीटी कंपनीवरील सिनेमे किंवा इतर काही पाहत असाल तर जाहिरीत पाहत ते पाहावे लागतात. या जाहिरातीमधून या ओटीटी कंपन्यांचा बिझनेस चालत असतो. उदा. Youtube, Dailymotion, MX player, Roku, Pluto TV आणि इ.

2. SVOD बिझनेस मॉडल म्हणजे काय?

या मॉडेलमध्ये तुम्हाला ओटीटी कंपन्यांची काही ठरलेले मासिक, सहा मासिक आणि वार्षिक शुल्क द्यावे लागते. यामध्ये तुम्हाला सिनेमा, वेब सीरीज किंवा कोणताही शो पाहताना जाहिरात पाहावी लागत नाही. एकही जाहिरातीविना तुम्ही संपूर्ण सिनेमा किंवा वेब सीरीजचा आनंद घेऊ शकता.

3. TVOD बिझनेस मॉडल म्हणजे काय?

या मॉडेलमध्ये तुम्हाला जो चित्रपट पाहयचा असेल त्याचेच जे काही शुल्क आहे ते भरावे लागते. इतर कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. रिलायन्स एन्टरटेंनमेंटचे (Pay Per View Buisness Model) या प्रमाणे हे असते. जसं की सिनेमागृहात एखादा चित्रपट येणार आहे तोच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो. यामुळे प्रेक्षकांचा वेळ आणि पैशांची बचत होते. सिनेमा हॉलमध्ये जाण्यासाठी प्रवासाचा खर्च, वेळ आणि तिथे गेल्यावर खाद्यपदार्थांसाठी लागणारा खर्च या सर्वांची बचत होते.

4. Hybrid Model

चौथा जो प्रकार आहे हायब्रिड मॉडेलचा यामध्ये अशा ओटीटी कंपन्या आहेत, ज्यामध्ये AVOD, SVOD आणि TVOD असतात. म्हणजेच तुमच्यासाठी काही सिनेमे विनामुल्य असतात तर काहींसाठी पैसे मोजावे लागतात. जसं की MX Player ने आता काही शो साठी शुल्क आकारायला सुरूवात केली आहे. Amazon Prime च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांसाठी वेगळे शुल्क भरावे लागते. जाहिरातींना वैतागून प्रेक्षक प्रीमियम खरेदी करतात.

ओटीटी कंपन्यांची सावध भूमिका

ओटीटी कंपन्यांनी आता चित्रपट घेताना सावध भूमिका घेतली आहे. कारण आधी चित्रपट रीलीज होण्याआधी पाण्यासारखा पैसे ओतणाऱ्या ओटीटी कंपन्या आता चित्रपट थिएटरमध्ये आल्यावर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे का नाही हे पाहतात. त्यानंतर संबंधित चित्रपटांसाठी पैसे खर्च करतात. त्यामुळे ओटीटी मालकांचा ब्रँडिंगचा खर्चही वाचत आहे.

अॅडल्ट कंटेटमुळे फास आवळणार?

ओटीटी कंपन्यांवर अॅडल्ट कंटेटमुळे नेहमी आक्षेप घेतला जातो. कारण वेब सीरीजमध्ये सेक्स सीन्स भडकपणे दाखवले जातात. संभाषणामध्ये शिवराळ भाषा आणि नग्नता यामुळे अनेकदा वेबी सीरीज आणि काही सिनेमांविरोधात तक्रार दाखल केली गेली होती. तांडव, मिर्झापूर आणि आश्रम या वेबसीरीज वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. काही वेब सीरीज तर अॅडल्ट कंटेटवर आधारित असलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा वेब सीरीज तयार करताना काही कायदे असायला हवेत.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.