पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील बड्या उद्योजकांशी संवाद साधणार, टाटा आणि अंबानींचाही सहभाग

जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद 2020 चं आयोजन अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF)कडून करण्यात आलं आहे. टाटा, अंबांनींसारख्या भारतातील बड्या उद्योजकांसह अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा देशांतील प्रमुख उद्योजक आणि गुंतवणूक कंपन्यांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील बड्या उद्योजकांशी संवाद साधणार, टाटा आणि अंबानींचाही सहभाग
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 9:27 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा २० देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वरिष्ठ अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातील नियामकही या बैठकीला उपस्थित राहतील. भारतातील अनेक मोठे उद्योजकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, नंदन नीलेकणी, उदय कोटक, दीपक पारेख आदी उद्योजकांचा समावेश असणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने भारताचं ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य, आर्थिक सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. (Prime Minister Modi will host the Virtual Global Investor Roundtable Summit today)

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद 2020 चं आयोजन अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF)कडून करण्यात आलं आहे.  शासकीय मालमत्ता निधी आणि निवृत्तीवेतन निधीसह जगभरातील सर्व प्रमुख गुंतवणूकदार या बैठकीत सहभागी असणार आहेत. या गुंतवणूकदारांकडे 6 हजार अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती आहे.

टाटा, अंबानींसारखे उद्योजकांचा सहभाग

या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, टाटा समुहाचे रतन टाटा, HDFCचे दीपक पारेख, सन फार्माचे दिलीप संघवी, इन्फोसिसचे नंदन निलेकणी आणि कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांसारखे अनेक दिग्गज उद्योजक सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर   प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बैठकीची प्रमुख उद्दिष्ट्ये

जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणे, भारताची आर्थिक स्थिती आणि गुतंवणुकींच्या संधींबाबत माहिती देणे, हे या बैठकीची प्रमुख उद्दिष्ट्ये सांगितली जात आहेत.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका

ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, राज्यात तब्बल 34 कोटींहून अधिकची गुंतवणूक, हजारो रोजगार उपलब्ध

Prime Minister Modi will host the Virtual Global Investor Roundtable Summit today

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.