इंधनाचे नवे दर जारी, सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये; जाणून घ्या राज्याच्या प्रमुख शहरातील दर
देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol, diesel rates) आज जाहीर करण्यात आले. दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी करण्यात येतात. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
Petrol, diesel rates : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol, diesel rates) आज जाहीर करण्यात आले. दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी करण्यात येतात. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या (Fuel) दरात आज देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol),डिझेलच्या किमतीमध्ये आज सलग अकराव्या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रशिय आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्याने भारतात देखील पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली होती. 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान पेट्रोल आणि डिझेल तब्बल लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक महागले. मात्र सहा एप्रिलनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. आज जाहीर झालेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. तर मुंबईमध्ये आज पेट्रोल, डिझेलचा भाव अनुक्रमे 120.51 आणि 104.77 इतका आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
- आज मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लिटर आहे.
- पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे.
- औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.11 रुपये तर डिझेल 102.82 रुपये लिटर आहे.
- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे.
- अहमदनगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120. 27 रुपये तर डिझेल 103.65 रुपये प्रति लिटर इतके आहे.
- लातूरमध्ये पेट्रोल, प्रति लिटर 121.38 रुपये लिटर तर डिझेलचा भाव 104.06 प्रति लिटर आहे.
- नाशिकमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.82 रुपये लिटर तर डिझेल 103.25 रुपये प्रति लिटर इतके आहे.
- राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर 123.53 रुपये लिटर आहे. तर डिझेलचा भाव 106.10 रुपये प्रति लिटर इतका आहे.
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 120.21 रुपये लिटर आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 102.90 इतका आहे.