Income Tax : करदात्यांना मोठा दिलासा, कर सवलतीचा नवीन आदेश, या टॅक्सपेअर्सला होईल मोठा फायदा..
Income Tax : या करदात्यांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली : आयकर विभागाने (Income Tax) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. विभागाने कर सवलतीचा नवीन आदेश दिला आहे. या नवीन आदेशानुसार, करदात्यांना (Tax Payers) उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रक्कमेवर कर सवलत (Exemption) मिळते. आयकर विभाग करदात्यांना दिलासा देण्यासाठी नियमात सारखा बदल करते. त्याचा फायदा करदात्यांना मिळतो. करदात्यांकडूनही यासंबंधीची मागणी करण्यात येते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDC) नुकताच याविषयीच्या अटी व शर्ती स्पष्ट केल्या आहेत. कोविड-19 च्या उपचारावर खर्च होणाऱ्या रक्कमेवर आयकर सवलत मिळते. त्यासाठी विभागाने एक फॉर्म दिला आहे. तो भरुन तुम्हाला आयकर विभागाने दिलेली कर सवलत मिळविता येईल.
5 ऑगस्ट 2022 रोजीच्या अधिसूचने नुसार, तुम्हाला तुमची कागदपत्रे आणि आयकर विभागाला एक फॉर्म जमा करावा लागणार आहे. कर्मचाऱ्याला त्याचे नातेवाईक कोविड-19 च्या उपचारासाठी प्राप्त रक्कमेवर कर सवलतीचा दावा दाखल करता येतो.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने घोषणा केली होती की, कोविड-19 उपचारासाठीच्या रक्कमेवर आणि कोविड-19 च्या कारणाने मृत्यू ओढावल्यास कुटुंबातील सदस्यांना मिळणाऱ्या मदतीवर आयकर कर लागणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात याविषयीची अधिसूचना देण्यात आली आहे.
ही सवलत आर्थिक वर्ष 2019-2020 साठी प्रभावी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय आयकर विभागाने कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचा लवकरात लवकर निपटाऱ्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा केली होती.
आयकर विभागाने लोकांच्या सुविधेसाठी आणि डिजिटलायझेशनला वृद्धी देण्यासाठी कर सवलत मिळण्यासाठीचा अर्ज डिजिटल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अनेक कामांसाठी तुम्हाला आयकर खात्याच्या चकरा माराव्या लागणार नाही.
या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात थेट कर जमा करण्यात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. 8.77 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. आयकर विभागाने नुकतीच याविषयीची माहिती दिली. एकूण कर वसुली 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजाच्या 61.79 टक्के आहे. गेल्या वर्षीपेक्षा नोव्हेंबर महिन्यात कर वसुली 24.26 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.