नवीन की जुनी, कोणती असेल तुमच्यासाठी चांगली, येथे एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती

Tax Regime : आरोग्य विमा, मुलांची शिकवणी शुल्क, गृहकर्जासह इतर अनेक व्यवहाराचा कर कपातीसाठी उपयोग होतो. त्यामुळे या सर्व गोष्टी गृहीत धरुन तुम्हाला जुनी किंवा नवीन कर प्रणाली निवडावी लागले. त्याआधारे तुमचा फायदा कशात आहे, ते समजून घ्यावे लागेल.

नवीन की जुनी, कोणती असेल तुमच्यासाठी चांगली, येथे एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती
नवीन की जुनी कोणती कर प्रणाली एकदम बेस्ट
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 9:44 AM

Old Tax Regime Vs New Tax Regime : देशात सध्या दोन कर प्रणाली आहेत. एक नवीन आणि दुसरी जुनी. वर्ष 2020 मध्ये केंद्र सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली होती. पण अजूनही लाखो करदाते जुन्याच कर प्रणालीला महत्व देतात असे चित्र आहे. भारतात एकूण 8.18 कोटींहून अधिक करदाते आहेत. त्यामध्ये सध्या 85 टक्के करदात्यांनी जुनी कर प्रणालीद्वारे आयकर जमा केला आहे.  तर चालू सत्रात 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडली आहे.  मग तुमच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य आहे?

कराचे गणित मांडा

तुमच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य राहील हे समजण्यासाठी अगोदर कराचे गणित मांडा. दोन्ही कर प्रणालीत कोणत्या सवलती मिळतात. कुठे कर कपातीचा फायदा मिळू शकतो, याचे गणित समोर ठेवा. अनेकजण अजूनही किरायाच्या घरात राहतात. अनेक नोकरदारांचा पीएफ कपात होतो. अनेकांकडे आता आरोग्य विमा आहे. मुलांच्या शिकवणी शुल्क, ट्यूशन फी अनेक जण देतात. अनेकांचे गृहकर्जाचे हप्ते सुरू आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे डिडक्शन, कपात सुरू आहे. या सर्वांचा विचार करुन तुम्हाला योग्य ती कर प्रणाली निवडावी लागेल.

हे सुद्धा वाचा

नवीन कर प्रणालीकडे पण ओढा

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, करदाते आता मोठ्या प्रमाणावर नवीन कर प्रणालीकडे वळाले आहेत. त्यातील अनेकांनी जुन्या कर प्रणालीला रामराम ठोकला आहे. चालू सत्रामध्ये जे आयकर रिटर्न (ITR) दाखल झाले आहेत. त्यातील 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडली आहे.

1 लाख पगारासाठी कोणती कर प्रणाली योग्य?

महिन्याला 1 लाख पगार असेल तर नवीन कर प्रणाली की जुनी कर प्रणाली योग्य राहिल, असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला एक लाख रुपयाचा पगार असेल आणि एक पण रुपया कर भरायचा नसेल तर करदात्यांना जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. त्यासाठी तुम्हाला मात्र गृहकर्ज, मेडिक्लेम पॉलिसी आणि इतर काही कर सवलतीच्या गुंतवणूक योजना माहिती असणे आवश्यक आहे.

'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.