1 एप्रिलपासून नवीन नियम लागू, घर खरेदी स्वस्त
मुंबई : आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. यामुळे अनेक नियमांमध्येही बदल झाले आहेत. नियम बदलल्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी फायदा होणार आहे, तर काही ठिकाणी अडचणी वाढणार आहेत. उदाहरण म्हणजे या नवीन आर्थिक वर्षात घर खेरदी करणे तुम्हाला स्वस्त पडणार आहे, तर कार खेरदी करणे तुम्हाला महाग पडू शकते. घर खरेदी होणार […]
मुंबई : आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. यामुळे अनेक नियमांमध्येही बदल झाले आहेत. नियम बदलल्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी फायदा होणार आहे, तर काही ठिकाणी अडचणी वाढणार आहेत. उदाहरण म्हणजे या नवीन आर्थिक वर्षात घर खेरदी करणे तुम्हाला स्वस्त पडणार आहे, तर कार खेरदी करणे तुम्हाला महाग पडू शकते.
घर खरेदी होणार स्वस्त
जीएसटी परिषदेने परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी दरात एक टक्क्याने घट केली आहे. तर इतर श्रेणीतील घरांवर पाच टक्क्याने कर लावला जात आहे. यामुळे एक एप्रिलपासून घर खरेदी करणे स्वस्त होणार आहे.
विमा योजना स्वस्त
1 एप्रिलपासून विमा कंपन्या मृत्यूदराच्या नव्या आकड्यांचे पालन करणार आहे. आतापर्यंत विमा कंपन्या 2006-08 च्या माहितीचा वापर करत होती. आता यामध्ये बदल करत 2012-14 करण्यात आली आहे. यामुळे विमा योजना स्वस्त होणार आहे. नवीन बदल केल्यामुळे सर्वात जास्त फायदा 22 ते 50 वर्षाच्या लोकांना होणार आहे.
भारतीय रेल्वे देणार नवीन सुविधा
भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून संयुक्त पीएनआर जाहीर करणार आहे. यामध्ये जर कुणाला आपला प्रवास वेगवेगळ्या ट्रेनने करायचे असल्यास तुमच्या नावावर संपूर्ण प्रवासासाठी एकच पीएनआर जाहीर करण्यात येईल. प्रवास करताना जर तुमची कनेक्टिंग ट्रेन सुटली तर राहिलेल्या प्रवासाचे भाडे रेल्वे तुम्हाला परत करणार. तसेच प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठीही परवानगी दिली जाईल.
EPFO चे नवीन नियम लागू
ईपीएफओचे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होत आहेत. तुम्ही नोकरी बदलली तर तुमचा पीएफ ट्रान्सफर होईल. यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागणार नाही. पहिले ईपीएफओच्या सदस्यांना UAN नंतरही पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागत होता.
पॅन लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
जर तुम्ही 31 मार्चपर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. सरकारने पॅनकार्ड लिंक करण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डसोबत आधार कार्ड नंबर असणे गरजेचे आहे.
करात सवलत
आर्थिक वर्षात 2018-19 तुमचे उत्पन्न पाच लाखांपर्यंत आहे तर चिंता करण्याची गरज नाही. तुमच्यावर कर लागणार नाही. यंदाच्या बजेटमध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे.
घर खरेदीसाठी स्वस्त गृहकर्ज
1 एप्रिलपासून सर्व कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या आदेशानंतर अपेक्षा केली जात आहे की, सर्व बँक आता एमसीएलआरच्या ऐवजी, आरबीआयद्वारे ठरवण्यात आलेल्या रेपो रेटनुसार बँकने कर्ज द्यावे. यामुळे व्याज दर कमी लागेल.
कारच्या किंमतीत वाढ
तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत आहे, तर आता ते तुमच्यासाठी थोडं कठीण जाईल. कारण टाटा मोटर्स, टोयोटा, किर्लोस्कर, जॅगवॉर, लँड रोव्हर इंडिया आणि इतर कंपन्यांनी आपल्या किंमतीत वाढ केली आहे.