टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, गुंतवणूकदार होणार मालामाल
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बाजारात येणार आहे. 19 वर्षांनी टाटा आयपीओ बाजारात उतरत आहे. त्यामुळे ग्रे मार्केट तापले आहे. टाटा समूहाच्या या आयपीओसाठी अनेक जण तयार आहेत. अनेकांनी गाठीचा पैसा काढला आहे. येत्या आठवड्यात बुधवारी हा आयपीओ बाजारात दाखल होईल. काय आहे याविषयीची अपडेट घ्या जाणून..
नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओकडे गुंतवणूकदार एका वर्षापासून डोळे लावून बसले आहेत. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची हवा आहे. जीएमपी 350 रुपयांचा आकडा ओलांडून पुढे धावल्याने गुंतवणूकदारांसाठी ही आनंदवार्ता आहे. हा आयपीओ बाजारात धुमाकूळ घालणार यात शंका नाही. किरकोळ गुंतवणूकदार टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओवर 22 नोव्हेंबर 2023 रोजीपासून नशीब आजमावू शकतील. येत्या आठवड्यात बुधवारी 22 नोव्हेंबर रोजी हा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. काय आहे याविषयीची अपडेट…
GMP म्हणजे तरी काय
टॉप शेअर ब्रोकरच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये आयपीओ आज 354 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. जर अशीच परिस्थिती असेल तर हा आयपीओ शेअर बाजारात 850 रुपयांहून अधिकवर सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांहून अधिकचा फायदा होऊ शकतो. कंपनी 5 डिसेंबर 2023 रोजी सूचीबद्ध, लिस्टिंग होईल.
24 नोव्हेंबरपर्यंत आजमावा नशीब
टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ सब्सक्राईब करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे 24 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंतचा वेळ आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित झाला आहे. सर्वसामान्य गुंतवूकदारांसाठी एका लॉटमध्ये 30 शेअर असतील. कोणत्या पण गुंतवणूकदाराला कमीत कमी 15 रुपयांचा डाव टाकावा लागेल. तर गुंतवणूकदार जास्तीत जास्त 390 लॉटमध्ये गुंतवणूक करु शकेल. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये प्रमोटर्सची एकूण 66.79 टक्के वाटा आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 55.39 टक्क्यांपर्यंत घसरेल. कंपनी 6.09 कोटी शेअर आणणार आहे.
ऑफर-फॉर सेल
टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर सेल (OFS) असेल. याअंतर्गत कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि सध्याचे प्रमोटर्स 9.57 कोटी शेअर्सची विक्री होणार आहे. माहितीनुसार, टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.
कमाईची संधी
2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आता टाटा टेक्नॉलॉजी शेअर बाजारात एंट्री करणार आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. आता गुंतवणूकदारांना लवकरच कमाईचा मोका मिळणार आहे.