Nita Ambani Birthday Special : केवळ मुकेश अंबानी यांची पत्नीच नाही, तर नीता अंबानी यांचे स्वतःचे पण मोठे साम्राज्य, 800 रुपयांची नोकरी ते कोट्यवधींची मालकीण, असा आहे थक्क करणारा प्रवास
Happy Birthday Nita Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. पण इतकीच त्यांची ओळख नाही. तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं स्वतःचं एक मोठं वर्तुळ आहे, एक साम्राज्य आहे. 800 रुपयांची नोकरी ते कोट्यवधींची मालकीण, कसा आहे त्यांचा थक्क करणारा प्रवास?
नीता अंबानी यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. या वयात ही त्यांनी वयाला लाजवलं आहे. त्या सक्रिय आणि तंदुरुस्त आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या त्या पत्नी आहेत. पण इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांनी रिलायन्समध्ये स्वतःचं एक वर्तुळ तयार केले आहे. त्यांचं एक मोठं साम्राज्य आहे. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याशिवाय कोणतेही काम होत नाही. 800 रुपयांची नोकरी ते कोट्यवधींची मालकीण, कसा आहे त्यांचा थक्क करणारा प्रवास?
असा होता हटके प्रवास
नीता अंबानी यांनी शिक्षणानंतर मुंबईत नोकरी धरली. मुकेश अंबानी यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या 800 रुपयांवर नोकरी करत होत्या. त्या एका शाळेत शिक्षिका होत्या. शिक्षण क्षेत्राशी त्यांचे नाते त्यानंतरही सुटले नाही. त्यामुळेच त्यांनी 2003 मध्ये ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ ची सुरुवात केली. येथूनच त्यांच्या साम्राज्याला सुरुवात झाली.
रिलायन्सचा ‘सामाजिक’ चेहरा
नीता अंबानी या आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा सामाजिक चेहरा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) घेणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या त्या संस्थापक आहेत. रिलायन्स फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, क्रीडा, सांस्कृतिक संबंध आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात ही संघटना काम करते.
क्रीडा क्षेत्रात मोठे नाव
नीता अंबानी यांना ‘फर्स्ट लेडी ऑफ स्पोर्ट्स’ असे म्हणतात. आयपीएलच्या टीम मुंबई इंडियन्सच्या सह मालक आहेत. हा संघ सर्वात यशस्वी आहे. त्या ऑलम्पिक समितीच्या सदस्या आहेत. या समितीत दाखल होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. नीता अंबानी यांचे भारतीय फुटबॉल क्षेत्रात ही योगदान आहे. त्या इंडियन सुपर लीगच्या चेअरपर्सन आहेत.
नीता अंबानी यांचे साम्राज्य
नीता अंबानी यांच्या साम्राज्यात लवकरच नवीन कंपनी येत आहे. वॉयकॉम 18 आणि स्टार इंडियाच्या विलिनीकरणानंतर नवीन कंपनीच्या त्या अध्यक्षा असतील. त्यांनी भारतीय महिलांसाठी ‘Her Circle’ नावाने डिजिटल मुव्हमेंट सुरू केली आहे. त्यामुळे महिलांचे महिलासोबतच सोशल नेटवर्क वाढेल. त्यांनी अनेक ठिकाणच्या कंपन्या, कारखान्यात सामाजिक आणि नैसर्गिक कामासाठी मोठा वाटा उचलला आहे.