चीनला धोबीपछाड कसा द्यायचा? वाचा गडकरी फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय उद्योजकांना चीनमधून होणारी आयात कमी करण्याचा फॉर्म्युला दिला आहे. (Nitin Gadkari )

चीनला धोबीपछाड कसा द्यायचा? वाचा गडकरी फॉर्म्युला
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 11:51 AM

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि लघूउद्योग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतीय उद्योजकांना चीनमधून (China) होणारी आयात कमी करण्याचा फॉर्म्युला दिला आहे . नितीन गडकरी फिक्की संस्थेच्या वार्षिक अधिवेशनला संबोधित करत होते. भारत सध्या चीनकडून अनेक वस्तू आयात करत आहे. मात्र, भारतीय उद्योगांनी गुणवत्ता आणि किमतीशी तडजोड न करता चीनच्या उत्पादनांना पर्याय निर्माण करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं आहे. फिक्कीच्या अधिवेशनात आयात कमी करुन निर्यात वाढवण्यावर जोर देण्याची गरज गडकरींनी व्यक्त केली. (Nitin Gadkari gave formula to reduce imports from China)

भारतीय उद्योगांनी आयात कमी करुन निर्यात वाढवल्यास देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल,असं नितीन गडकरी म्हणाले. आयात कमी होऊन निर्यात वाढल्यास जीडीपी वाढण्यास मदत होईल, असंही त्यांनी सांगितले. गडकरींनी अधिवेशनात इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये वापरले जाणाऱ्या चुंबकाचे उदाहरण दिले. (Nitin Gadkari gave formula to reduce imports from China)

भारतीय उद्योगांनी इलेक्ट्रीक वाहननिर्मितीकडे लक्ष द्यावं

नितीन गडकरी यांनी चुंबक आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर चीन मधून आयात करत आहोत, असं सांगितले. गडकरींनी व्यापारातील तज्ञ नसलो तरी आगामी काळात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीत संधी असल्याचे म्हटले. इलेक्ट्रीक कार (electric cars), ई-बाइक (e-bikes) , इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा (electric autorickshaws) आणि इलेक्ट्रीक ट्रक (electric trucks) या क्षेत्रांमध्ये आपल्याला स्वेदशी पर्याय देण्यासाठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींनी व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांना देशांतर्गत वाहन उद्योग क्षेत्राशी चर्चा करण्यास सांगतिले. सध्या चुंबक आणि लीथियम आयन बॅटरी आयात केली जात आहे. यासारख्या उत्पादनांना भारतीय उद्योग क्षेत्रानं गुणवत्ता आणि उत्पादन खर्चासह किमतीमध्ये तडजोड न करता पर्याय देण्याचे आवाहन गडकरींनी केले. (Nitin Gadkari gave formula to reduce imports from China)

भारतीय बाजारपेठेत पैसा वाढवण्याची गरज नितीन गडकरींनी व्यक्त केली. आरबीआयकडे बँकांनी 9 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्यावर दोन टक्के व्याज मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरबीआयकडे त्या पैशाचा वापर लोकांसाठी करावा अशी भू्मिका घेतली आहे. सरकार इथेनॉल सारख्या जैविक इंधनाला देखील प्रोस्ताहन देत असल्याचे गडकरींनी सांगितले. (Nitin Gadkari gave formula to reduce imports from China)

संबंधित बातम्या:

SBI| ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर…एसबीआयने दिले मोठे गिफ्ट!

Indias Property Rate | घर खरेदीचा प्लॅन करताय ? मग बघा जगाच्या तुलनेत आपल्याकडे किती स्वस्त? किती महाग ?

(Nitin Gadkari gave formula to reduce imports from China)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.