Paints : नितीन गडकरी का आहेत या रंगांविषयी आग्रही, चार भिंतींची दणक्यात करा रंगरंगोटी, रासायनिक पेंटपेक्षा दिसायला मस्त, खर्चात ही स्वस्त! 

Paints : या देशी रंगांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी का आहेत आग्रही..

Paints : नितीन गडकरी का आहेत या रंगांविषयी आग्रही, चार भिंतींची दणक्यात करा रंगरंगोटी, रासायनिक पेंटपेक्षा दिसायला मस्त, खर्चात ही स्वस्त! 
स्वस्तात रंगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:49 PM

नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या रंगांसाठी का आहेत प्रचंड आग्रही, तुम्हाला माहिती आहे का या पेंट्ची (Paints) कमाल? रंग टिकाऊ तर आहेच पण बाजारातील सध्याच्या पेंट्सपेक्षा तो जास्त स्वस्त आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रंग आहेत तरी काय? ते कशापासून तयार होतात. बाजारातील सध्याच्या पेंट्सपेक्षा ते इतके का स्वस्त (Cheap) आहेत. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून तुम्हाला हा रंग खरेदी करण्याच मोह आवरणार नाही.

बाजारात सध्या रसायनयुक्त पेंट्स मिळतात. अनेक ब्रँड सध्या बाजारात आहेत. या पेंट्सची किंमत ही आव्वाच्या सव्वा आहे. साध्या वॉटरबेस रंगापासून ते वॉटरप्रुफ, सूर्यप्रकाश परावर्तीत करणारे आणि निरनिराळे रंग बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही ही जास्त आहे.

पण या रंगांपेक्षा हा देशी रंग वेगळा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा रंग तयार कशापासून होतो. तर हा पेंट्स गाईंच्या शेणापासून तयार होतो. ही गोष्ट तुम्हाला कदाचित विश्वसनीय वाटत नसेल. पण गाईंच्या शेणापासून तयार होणारा हा रंग सध्या बाजारात भाव खात आहे.

हे सुद्धा वाचा

तर सर्वात अगोदर या पेंट्सची किंमत जाणून घेऊयात. बाजारात सध्या केमिकल रंग मिळतात. रसायनयुक्त एक लिटर पेंट्ची किंमत 350 रुपये आहे. तर गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या पेंटची किंमत अवघी 150 रुपये प्रति लिटर आहे. या पेंटची वैदिक पेंट नावाने विक्री करण्यात येत आहे.

गायीच्या शेणापासून हा पेंट तयार होत असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल. त्यांना आर्थिक मदत मिळेल. तर सध्याच्या रसायनिक पेंट्मध्ये शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम सारखी धोकादायक रसायनांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे घराचे आणि घरातील माणसांचं आरोग्य निरोगी राहत नाही.

याउलट खादीच्या नैसर्गिक पेंटमध्ये कुठल्याही धातुचा वापर होत नाही. हा पेंट् अॅंटिबॅक्टिरिअल, अँटीफंगल असल्याने घर सुरक्षित राहते. घरातील लोकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो. हिवाळ्यात घराला ऊब मिळते तर उन्हाळ्यात घर थंड राहते.

त्यामुळे नितीन गडकरी या पेंटविषयी आग्रही आहेत. त्यांनी सर्वच केंद्रीय आणि राज्यातील कार्यालयांना हा रंग लावण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या या विनंतीला काँग्रेसशासित छत्तीसगडने चांगला प्रतिसाद दिला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी हा रंग सरकारी कार्यालयांसाठी वापरण्याची वकिली केली आहे.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.