NHAI: नितीन गडकरी यांच्या फेरविचारानंतर गुंतवणूक डबल, गुंतवणूकदार होणार मालामाल
NHAI: सरकारच्या या योजनेत नागरिकांचा सहभाग वाढणार आहे. कोणती आहे ही योजना..
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घोषणेमुळे या सरकारी योजनेत (Government Scheme) नागरिकांचा सहभाग वाढणार आहे. गुंतवणूक डबल (Double Investment) होणार असल्याचा फायदाही नागरिकांना भेटणार आहे. या योजनेविषयी माहिती घेऊयात.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) बाँडची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. या योजनेसाठी लोकांमधूनही निधी उभारण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. नागरिकांना गुंतवणूक करता यावी यासाठी काही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या योजनेत, म्हणजे InvIT बाँडमध्ये यापूर्वी 25 वाटा राखीव ठेवण्यात आला होता. परंतु, नितीन गडकरी यांनी या योजनेला वाढता प्रतिसाद पाहता, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी दारं उघडली आहेत. त्यांना गुंतवणुकीची संधी देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुंतवणूक वाढण्यासाठी एक मार्ग काढला आहे. InvIT बाँडमध्ये यापूर्वी 25 वाटा राखीव ठेवण्यात आला होता. त्यात आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठी वाटा दुप्पट करुन 50 टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना सहभागी होता येणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल माध्यमातून बैठक घेतली. त्यात त्यांनी या बाँडला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल ते भरभरून बोलले. देशातील लोक राष्ट्र निर्मितीच्या योजनेत सहभागी होत असल्याचे कौतुकही त्यांनी केले.
या बाँडमध्ये नागरिकांना 10,000 रुपयांच्यावर कितीही मोठी गुंतवणूक करण्यास मूभा देण्यात आली आहे. या गुंतवणुकीवर नागरिकांना वार्षिक 8.5% परतावा देण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा होताच, तिला उदंड प्रतिसाद मिळाला.
या योजनेत आतापर्यंत 1,500 कोटी रुपयांचे बाँड जारी करण्यात आले आहे. या बाँडसाठी गुंतवणूकदारांचा अक्षरशः पाऊस पडला. सात पटीने या योजनेत गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदविला. अपेक्षेपेक्षा हा उदंड प्रतिसाद होता.