Domino’s Pizza: डॉमिनोजचा दे धक्का! स्विगी, झोमॅटोवरून डिलीव्हरी करणार बंद? हे आहे कारण
ऑनलाइन डिलीव्हरी ॲप्सना सध्या मोठी मागणी असून अनेक जण त्यावरुनच खाणं-पिणं ऑर्डर करण्यास प्राधान्य देतात. स्विगी, झोमॅटो (Swiggy, Zomato) ही त्यातील महत्वाची आणि लोकप्रिय नावं आहेत. मात्र डॉमिनोज (Domino’s Pizza) या विख्यात पिझ्झा फ्रॅंचायझीने स्विगी, झोमॅटोवरून फूड डिलीव्हरी (Food Delivery) देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीवरून डॉमिनोजचा […]
ऑनलाइन डिलीव्हरी ॲप्सना सध्या मोठी मागणी असून अनेक जण त्यावरुनच खाणं-पिणं ऑर्डर करण्यास प्राधान्य देतात. स्विगी, झोमॅटो (Swiggy, Zomato) ही त्यातील महत्वाची आणि लोकप्रिय नावं आहेत. मात्र डॉमिनोज (Domino’s Pizza) या विख्यात पिझ्झा फ्रॅंचायझीने स्विगी, झोमॅटोवरून फूड डिलीव्हरी (Food Delivery) देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीवरून डॉमिनोजचा पिझ्झा ऑर्डर करता येणार नाही. देशातील लोपक्रिय फूड डिलीव्हरी ॲप्सपैकी असणाऱ्या झोमॅटो आणि स्विगीविरोधात कंपनीने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल, याचीच चर्चा सुरु आहे. या कंपन्यांचे वाढते कमिशन रेट हे त्यामागचं महत्वाचं कारण असल्याचे बोलले जात आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स (Jubilant Food Works) या कंपनीतर्फे भारतात ‘डॉमिनोज’ पिझ्झा आणि ‘डंकिन्स’ डोनट्सच्या आऊटलेट्सची साखळी चालवण्यात येते. त्यामध्ये डॉमिनोजची 1567 तर डंकिन डोनट्सची 28 आऊटलेट्स आहेत.
वाढत्या कमिशनमुळे, डॉमिनोजने त्यांचा बिझनेस ऑनलाइन प्लॅटफॉर्मऐवजी इन-हाऊस ऑर्डरिंग सिस्टीमद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पत्रात लिहीलेल्या माहितीनुसार, डॉमिनोजच्या भारतातील एकूण व्यापारापैकी 26 ते 27 टक्के व्यापार ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाला आहे. ज्यामध्ये कंपनीचे स्वत:चे (डॉमिनोज) मोबाईल ॲप आणि वेबसाईटचा समावेश आहे. झोमॅटो, स्विगी सारखी इतर डिलीव्हरी ॲप्स 20-30 टक्के कमिशनची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप असून ते अयोग्य आहे, कंपनीने म्हटले आहे. वाढत्या कमिशनच्या पार्श्वभूमीवर ज्युबिलंट कंपनी स्वत:ची प्रॉडक्ट्स आपल्याच डिलीव्हरी प्लॅटफॉर्मवर ट्रान्स्फर करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
सध्या ऑलाइन डिलीव्हरी ॲप्स अनेक आकर्षक डिस्काऊंट देत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. स्विगी व झोमॅटो त्यातील अग्रगण्य नावे आहेत. मात्र त्यांच्यावर कमिशनची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप होत आहे. एवढे कमिशन घेणे व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य आहे, असे अनेक रेस्टॉरंट उद्योजकांचेही म्हणणे आहे. या दोन्ही फूड डिलीव्हरी ॲप्सच्या वाढत्या गैरव्यवहारांबद्दल नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) एप्रिल महिन्यात चौकशी सुरू केली होती.
डिलीव्हरी ॲप्सनी कमीशनमध्ये वाढ केल्यास रेस्टॉरंटचे मालक आणि उद्योजकांचा नफा कमी होईल, अशी चिंता एका रेस्टॉरंट उद्योजकाने व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर डॉमिनोजने स्विगी, झोमॅटोवरून फूड डिलीव्हरी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.