देशात नोकऱ्यांची प्रचंड ओरड होत आहे. चांगले शिक्षण घेऊनही बेरोजगाराची आकडा चढाच आहे. पण ही कंपनी होतकरु तरुणांना नोकरी देण्यासाठी पुढे आली आहे. देशातील दिग्गज आयटी कंपनी 10 हजारांहून अधिक जणांना नोकरी देणार आहे. देशातील दिग्गज आयटी कंपनी HCL Tech ने चौथ्या तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केला. त्यात कंपनीने येत्या एका वर्षांत 10 हजारांहून अधिक फ्रेशर्सला जॉब देण्याची घोषणा केली आहे. आयटी कंपनीने यापूर्वीचे रोजगार देण्याचे आकडे पण समोर आणले आहे. या कंपनीने देशातील तरुणांचे भविष्य घडविण्यात कोणत्याही प्रकारची कसर ठेवलेली नाही.
गेल्या वर्षी किती जणांना दिला जॉब
HCL Tech चे मुख्य लोकाधिकारी, रामचंद्रन सुंदरराजन यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये जवळपास 15,000 फ्रेशर्सच्या हाताला काम देण्याचे नियोजन होते. आर्थिक वर्षात कंपनीने 12 हजार होतकरुंना काम दिले. मध्यंतरी काही अस्थिरता होती. पण आता कंपनी पुन्हा भरती प्रक्रिया राबविणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नेट फ्रेशर्सची संख्या 3,096 इतकी होती. संपूर्ण आर्थिक वर्षात HCL Tech ने 12,141 नवीन तरुणांन रोजगाराची संधी दिली. चौथ्या तिमाहीत कंपनीत एकूण 227,481 कर्मचारी होती.
10,000 अधिक हातांना काम
या वर्षभरात आम्ही याच प्रकारे नियुक्तीचे सत्र राबवू असे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीने 10,000 हून अधिक फ्रेशर्सला जॉब देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सुंदरराजन यांनी सांगितले. कॅम्पस प्रोग्राम सह नवीन भरती प्रक्रिया राबविण्याचा कार्यक्रम असाच पुढे सुरु ठेवण्यात येणार आहे. मागणीनुसार, प्रत्येक तिमाहीत होतकरु तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे.
इतक्या तरुणांनी सोडली नोकरी
ही कंपनी तरुणांना रोजगार देत असली तरी, नोकरी सोडणाऱ्यांची संख्या पण कमी नाही. या कंपनीतून 12.4 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. कंपनी काँन्ट्रॅक्ट हायरिंगचा विचार करत आहे, पण ही बाब खूप तांत्रिक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अंतर्गत कर्मचारी मागणीची पूर्तता करणे कठीण होते, त्यावेळी काँन्ट्रॅक्ट हायरिंगचा विचार करण्यात येतो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कॉन्ट्रक्ट हायरिंगमध्ये मोठी घसरण झाल्याचे सुंदरराजन यांनी सांगितले.